AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Worlds Richest Man : 60000 नोकर आणि सोनं लादलेले 100 ऊंट.. जगातल्या या सर्वात श्रीमंत माणसाबद्दल माहीत आहे का ?

14 व्या शतकातील आफ्रिकी सम्राट मनसा मुसाची संपत्ती आजच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपेक्षाही अनेक पटीने जास्त होती असे मानले जाते. त्यांच्या मालमत्तेचा अंदाज ४०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. त्यांच्या राज्यकालातील सोने आणि इतर नैसर्गिक संपत्तीमुळे त्यांचे नशीब वाढले. त्यांचा मक्काच्या हजयात्रेचा प्रवासही इतिहासात नोंदवला गेला आहे.

Worlds Richest Man : 60000 नोकर आणि सोनं लादलेले 100 ऊंट.. जगातल्या या सर्वात श्रीमंत माणसाबद्दल माहीत आहे का ?
Image Credit source: social media
| Updated on: Aug 30, 2025 | 1:06 PM
Share

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. पण इतिहासाच्या पानांमध्ये अशा एका व्यक्तीचा माहिती दडली आहे की त्याचीची संपत्ती आजच्या सर्वात श्रीमंत लोकांपेक्षाही जास्त होती. त्या व्यक्तीच्या तुलनेत आजच्या काळातील श्रीमंत उद्योगपती अंबानी, अडानी, एलन मस्क हे कुठेच नाही. ही व्यक्ती म्हणजे, 14 व्या शतकातील आफ्रिकी सम्राट मनसा मूसा, जो कदाचित आत्तापर्यंत पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्याइतकी संपत्ती कुणाकडेच नसावी.

400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्ता

मानसा मुसाचा जन्म 1280 मध्ये झाला. त्यानंतर 1312 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील विशाल माली साम्राज्याच्या सिंहासनावर बसला. जर आजच्या मानकांनुसार मुसाच्या संपत्तीचा अंदाज लावला तर त्याची किंमत 400 अब्ज डॉलर्स आहे. आजच्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांच्यापेक्षा देखील ही संपत्ती दुप्पट आहे. आजचे श्रीमंत लोकही संपत्तीच्या बाबतीत मुसा यांच्या पेक्षा खूप मागे पडतील. त्याची संपत्ती ही त्याच्या राज्यातील विपुल नैसर्गिक संसाधनांमधून निर्माण झाली. मालीमध्ये बांबुक, वांगारा, बुरे, गालाम आणि तघाझा या खाणींमधून सोने काढले जात असे. मुसाने आयव्हरी कोस्ट, सेनेगल, माली आणि बुर्किना फासोसह अनेक समकालीन आफ्रिकन देशांवर राज्य केले. मुसाची शाही राजधानी टिंबक्टू होती.

करूणा आणि दयाळूपणासाठी होते प्रसिद्ध प्रसिद्ध होते. असं म्हटलं जातं की तो त्याच्याकडे मदत मागणाऱ्यांना भरभरून सोनं देत असे. से. लंडनमधील स्कूल ऑफ आफ्रिकन अँड ओरिएंटल स्टडीजच्या लुसी डुरन हे मुसाच्या उदारतेचे प्रतीक म्हणून अधोरेखित केलं जातं. तसेच त्याने घेतलेल्या अनेक निर्णयांचे इतिहासात कौतुक केले जाते. या सम्राटाकडे नैसर्गिक संसाधनांसह मोठ्या जमिनी होत्या, ज्यामुळे त्याचे नशीब लक्षणीयरीत्या वाढले.

एका प्रवासामुळे इतिहासातं लिहीलं गेलं नाव

1324 मध्ये मनसा मुसा हे हज यात्रेसाठी मक्काला गेले होते. या प्रवासामुळे त्यांचे नाव इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून अजूनही नोंदवले जाते. बीबीसीच्या वृत्तानुसार, हजसाठी जाणारा त्यांचा कारवां सहारा वाळवंट ओलांडणारा आतापर्यंतचा सर्वात मोठा ताफा होता. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की मनसा मुसा सोनं लादलेले 100 उंट, 12000 नोकर आणि 60 हजार गुलाम यांच्या ताफ्यासह सौदी अरेबियातील मक्का येथे प्रवासाला निघाला होता. इतिहासकारांचा असा अंदाज आहे की या प्रवासात मुसाने 18 टन सोने वाहून नेले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सध्याच्या त्याची किंमत सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. इतिहासातील सर्वात श्रीमंत राजा म्हणून मानसा मुसाचे नाव घेतले जाते. मुसाच्या संपत्ती आणि उदारतेच्या इतक्या कथा आहेत की आजचे अब्जाधीश त्याच्यासमोर खूपच मागे पडतील. मुसाचा प्रवास सुरू असताना त्याचा ताफा इतका मोठा होता की पाहणारे आश्चर्यचकित व्हायचे

दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.