Video : शेखर रेड्डी जेव्हा क्रांती रेडकरच्या शोधात घरी येतो… तेव्हा नेमकं काय घडतं पाहा…

क्रांती रेडकरने तिच्या शोधात आलेल्या एका व्यक्तीचा किस्सा सांगितला आहे. तिने सांगितलं आहे की, शेखर रेड्डी नावाची व्यक्ती तिच्या घरी येते.

Video : शेखर रेड्डी जेव्हा क्रांती रेडकरच्या शोधात घरी येतो... तेव्हा नेमकं काय घडतं पाहा...
क्रांती रेडकर
आयेशा सय्यद

|

May 06, 2022 | 4:08 PM

मुंबई : अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असते. तिच्या रिल्समधून ती लोकांचं मनोरंजन तर करतेच सोबतच वास्तवाची जाणिवही करून देते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या बिघडणाऱ्या गोष्टी ती इन्स्टाग्राम रील्सच्या (Instagram Reel) माध्यमातून लोकांसमोर मांडत असते. आताही तिने तिच्यासोबत वारंवार घडणारा किस्सा सांगितला आहे. तिच्या शोधात एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीचं नाव आहे शेखर रेड्डी (Shekhar Reddy) . ही व्यक्ती क्रांतीच्या घरात येते. अन् पुढे मग काय घडतं ते तिने या रीलमध्ये सांगितलं आहे.

जेव्हा शेखर रेड्डी क्रांती रेडकरच्या शोधात तिच्या घरी येतो…

क्रांती रेडकरने तिच्या शोधात आलेल्या एका व्यक्तीचा किस्सा सांगितला आहे. तिने सांगितलं आहे की, शेखर रेड्डी नावाची व्यक्ती तिच्या घरी येते. तेव्हा तिच्या घरी काम करणारी व्यक्ती तिला सांगते की तुम्हाला भेटायला शेखर रेड्डी आला आहे. त्यावर क्रांतीने सांगितलं आहे आहे की मी विचार केला की, “माझ्या कॉन्टॅक्टमध्ये शेखर रेड्डी आहे? पण मला कुणी आठवलं नाही… मग मला वाटलं की, समीरच्या ओळखीचं कुणी असेल म्हणून मग मी तिलाच म्हटलं बघ कोण आहे ते… त्यावर ती पुन्हा आली आणि म्हणाली, मॅडम आपकोही बुला रहा है… मग मी बघायला गेले तर तो सिक्युरिटी गार्ड होता… असं आहे सगळं!”

तिच्या या व्हीडिओला हजारो ह्यूज मिळाले आहेत. तर पाच हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केलं आहे. तसंच कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

या आधीही क्रांतीने कानातल्या झुमक्यांचा किस्सा सांगितला होता. त्याचा व्हीडिओही चर्चेत होता. यात तिने तुटलेल्या कानातल्याचा एक भन्नाट किस्सा रंगवून सांगितला आहे. “माझ्यासोबत खरंच कानातल्यांचं कर्म वगैरे काहीतरी आहे. कारण एका लग्नात आणि एका कार्यक्रमात मी असं तुटलेलं कानातलं घालून फिरलेय. माझं खरंच मागच्या जन्मात कानातलं विकणाऱ्या सोबत माझं भांडण झालं असेल आणि तो म्हणाला असेल, मी तुला पुढच्या जन्मात बघून घेईल. नाही तुझं कानातलं भर कार्यक्रमात तुटलं तर नावाचा कानातले वाला नाही!, त्याचेच हे परिणाम असावेत. शंभर लोकांसोबत फोटो काढलेत. पण मला कुणीही सांगितलं नाही की तुझं कानातलं तुटलं आहे आणि आता कमेंट करून सांगतील की खरंतर मॅडम मी सांगणारच होते, पण… “, असं रील क्रांतीने शेअर केलंय.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें