AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Christmas: अरे देवा! Santa Claus आपसांत भिडले, लाथा बुक्क्या, दे दणादण

जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही .

Christmas: अरे देवा! Santa Claus आपसांत भिडले, लाथा बुक्क्या, दे दणादण
Santa claus fightingImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 24, 2022 | 2:28 PM
Share

नाताळचा माहोल आहे आणि सोशल मीडियावर यासंबंधित व्हिडिओही येऊ लागले आहेत. हे व्हिडीओ मनोरंजन करतात.व्हिडीओ आवडले की ते फटाफट शेअर होतात आणि तसेच ते व्हायरल होतात. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ आलाय. जे पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही .

ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज घरोघरी जाऊन मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देतात असा हल्ली ट्रेंड आहे. नाताळ आला की मुलंही सांताक्लॉजची वाट बघतात.

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये येशूच्या जन्मदिनी प्रार्थना केली जाते, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असतो. सणाविषयी खूप छान छान गोष्टी आपण नेहमी ऐकतो पण तुम्ही कधी सांता आपापसांत भांडताना पाहिला आहे का? नाही? अहो असाच एक व्हिडीओ आहे ज्यात सांता आपसांत भांडत आहेत. व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यात चार-पाच सांता आपापसात भांडताना दिसत आहेत.

काही लोक रस्त्यावर एका कुठच्या तरी कारणामुळे भांडताना दिसत आहेत. या भांडणाची सर्वात खास गोष्ट म्हणजे सर्वांनी सांताक्लॉजची वेशभूषा परिधान केली आहे. ज्यामुळे या सगळ्यांमधील हे भांडण इंटरनेटवर व्हायरल झाले आहे. हे सांता एकमेकांना लाथा बुक्क्या मारताना दिसतायत. व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सही खळखळून हसतात.

@ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिताना ६ हजारांहून अधिक लोकांनी ते पाहिले असून त्यावर कमेंट केली आहे. एका युझरने म्हटले आहे की, “मला वाटते की हे सर्व जण भांडत आहेत कारण भेटवस्तू योग्यप्रकारे वाटल्या गेल्या नाहीत..”

Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....