मैं ऐश्वर्या राय बनना चाहती हूँ..; महाकुंभमध्ये माळा विकणाऱ्या सुंदर डोळ्यांच्या मुलीचं बॉलिवूड ड्रीम
महाकुंभामध्ये चर्चेत आलेली एक सुंदर डोळ्यांच्या मुलगी म्हणजे मोनालिसा. ही मोनालिसा म्हणजे महाकुंभामध्ये माळा विकणारी एक साधी सरळ मुलगी. पण या मुलीच्या डोळ्यांनी सर्वांवरच जादू केली. दरम्यान तिला ऐश्वर्या रायसारखं बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचंही म्हटलं आहे.

महाकुंभमध्ये अनेकजण चर्चेच्या झोतात येतच असतात. मग त्यात साध्वी असो किंवा मग नागासाधू, प्रत्येकांची वेगळी वेगळी कहाणी आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध महाकुंभसाठी कोट्यावधी लोक जमले आहेत. सोशल मीडियाच्या युगात, महाकुंभशी संबंधित अनेक गोष्टी, लोक आणि विधी आता ट्रेंडिंग होऊ लागल्या आहेत.
महाकुंभामध्ये चर्चा एका सुंदर डोळ्यांच्या मुलीची
आता या महाकुंभामध्ये चर्चा झाली ती एका सुंदर डोळ्यांच्या मुलीची. ही मुलगी अवघ्या 16 वर्षांची असून तिचे डोळे हे अत्यंत सुंदर आहे. या मुलीचे नाव मोनालिसा असून ती प्रयागराज महाकुंभमध्ये रुद्राक्ष आणि इतर मणी विकून ती तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. मोनालिसा ही मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे.
कोणीतरी मोनालिसाचा व्हिडीओ बनवला आणि शेअर केला, त्यानंतर तो सोशल मीडियावर इतका जोरदार व्हायरल झाला. मोनालिसाला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली. मोनालिसाच्या मुलाखती घेतल्या जाऊ लागल्या आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम आणि एक्सवर वेगाने शेअरही केले जाऊ लागले.
बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा
मोनालिसाला बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचंही ती म्हणाली. कोणीतरी विचारलं की जर तिला बॉलिवूडमधून चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली तर काम करायला आवडेल का? यावर मोनालिसाने उत्तर दिलं की, तिला नक्कीच अभिनय करायला आवडेल.
एवढच नाही तर, मोनालिसाला एश्वर्या राय बच्चन सारखं चित्रपटांमध्ये काम करून यशस्वी व्हायचं असल्याचंही तिने म्हटलं आहे. मात्र व्हायरल झाल्यानंतर, वाढत्या गर्दीच्या दबावामुळे तिला महाकुंभ सोडावं लागलं.
महाकुंभमधून नेण्याची धमकी, अखेर महाकुंभ सोडावं लागलं
कारण मोनालिसाने सांगितलं की, तिचं सौंदर्य पाहून काही लोकांनी तिला महाकुंभमधून नेण्याची धमकीही दिली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, मोनालिसाला महाकुंभमध्ये इतक्या लोकांनी वेढलं होतं की, ती अस्वस्थ झाली. व्हिडिओ, सेल्फी आणि रील बनवणारे लोक मोनालिसाला फॉलो करत आहेत, ज्यामुळे तिला अनेकदा साधूंच्या तंबूत आश्रय घ्यावा लागला.
मोनालिसाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची विनंतीही केली. मोनालिसाने सांगितलं होतं की, सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या नावाखाली लोकांची गर्दी तिच्याभोवती असते. ज्यामुळे तिला तिच्या माळा विकणं कठीण होत आहे आणि तिच्या कमाईवर विपरीत परिणाम होत आहे. तिच्या कुटुंबाने कर्ज काढून लाखो रुपयांच्या वस्तू येथे आणल्या आहेत. मात्र आता त्याला वस्तू विकण्यात अडचणी येत असल्याचंही तिने म्हटलं आहे.