AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : 100 टक्के बुलडोझर फिरवा, TCS प्रकरणावर चित्रा वाघ यांची रोखठोक भूमिका, अजून जर असे कोणी खरात असतील, तर…

Chitra Wagh : "महिला आरक्षण कायदा मंजूर होऊ शकला नाही. अत्यंत दुःखद दिवस होता. 27 वर्षांचा हा संघर्ष होता. मोदी आम्हाला 33 टक्के आरक्षण देणार होते. मात्र हे यूपीएसचे घटक यांनी या बिलाला विरोध केला. देशातल्या मातृ शक्ती पुढे आलेला घास हिरावून घेतला गेला. विरोधी पक्षातील महिलाना देखील याचा फायदा होणार होता" असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Chitra Wagh : 100 टक्के बुलडोझर फिरवा, TCS प्रकरणावर चित्रा वाघ यांची रोखठोक भूमिका, अजून जर असे कोणी खरात असतील, तर...
Chitra Wagh
| Updated on: Apr 18, 2026 | 2:21 PM
Share

“TCS सारख्या कंपनीत विशाखा सारख्या कमिटी मध्ये तक्रार आल्याचे उत्तर नव्हते. हा कायदा फक्त शासकीय स्थापनेत नाही तर खाजगी आस्थापनेत पण आहे. महिला व मुली नाईलाजाने या गोष्टी सहन करतात. पॉश ॲक्ट मध्ये बदल होणं गरजेचं आहे. ज्या कंपनीच्या सहली जातात तिथे पण महिलांचा छळ केला जातो. व्हॉट्सॲप मध्ये चॅटिंग मधून देखील महिलांना छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याच्यात बदल होणं गरजेचं आहे” असं आमदार आणि भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या. “10 पेक्षा जास्त महिला असेल तिथे पॉश ॲक्ट लागू होतो. हे एक विभागाचे काम नाही. यासाठी flying scod निर्माण केला गेला पाहिजे. ज्या गोष्टी कायद्यात सांगितल्या आहेत, त्याच्या तरतुदी झाल्या पाहिजेत. या कायद्यात अट टाकली पाहिजे जेणेकरून ते सरकारी दरबारी आलं पाहिजे. 90 दिवसाच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे अशी पण एक तरतूद यात केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. sop बनवून ती लागू करावी यासाठी मागणी करणार” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“महिला आयोगाचे पद जरी रिकामे असले तरी बाकीचे अधिकारी काम करत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील भेटलो. बारामतीचे इलेक्शन झाल्यानंतर महिला आयोग पद भरले जाईल. कारण ते पद राष्ट्रवादीकडे होते. ज्या महिलांवर छळ करण्यात आले ते लांडगे आहेत. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एक दोघांना ठेचले पाहिजे. अनेक महिला पुढे येत नाहीत. मात्र माझ्या प्रयत्नांना यश येईल. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

‘एखाद्याला पकडणे सोपे पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड’

“अशोक खरात यांना पण ठेचण्याचे काम सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही. तीन महिन्या अगोदर ही कुणकुण लागली होती. त्याचे पुरावे आले. मग खरातवर कारवाई झाली. एखाद्याला पकडणे सोपे पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते. खरातच्या मागे ईडी, एसआयटी, सीबीआय सगळे लागलेले आहे. रोज त्याची प्रकरण बाहेर येत आहेत. महिलाना सांगते, अजून असे कोण खरात असतील, ज्याने गैरफायदा घेतला असेल त्यांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात. त्यांना आपण शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

‘100% बुलडोझर चालला पाहिजे’

“100% बुलडोझर चालला पाहिजे. आमची भूमिका आहे. TCS मधील आरोपींना सोडणार नाही. खरात याला पण सोडणार नाही. तेजस्वी सातपुते सारख्या कर्तृत्वान अधिकारी खरात प्रकरणाचा तपास करत आहेत. येणाऱ्या दिवसात रिझल्ट हे मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला विश्वास आहे ते नक्की हे काम पूर्ण करतील” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत