हे माकड मृत व्यक्तीला उठवायचा प्रयत्न करतंय, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय! पाहिलाय?

लोकांनी माणूस आणि प्राणी यांच्या मैत्रीचं कौतुक केलंय. माकडाचे हे कृत्य ते कुटुंब स्तब्ध झाले.

हे माकड मृत व्यक्तीला उठवायचा प्रयत्न करतंय, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय! पाहिलाय?
Monkey paying tribute
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2022 | 7:29 PM

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माकड एका व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित राहतो जो त्याची काळजी घेत असे आणि दररोज त्याला खायला देत असे. या क्लिपमध्ये माकड त्या मृत व्यक्तीला शरीराजवळ जाऊन उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी हळहळ व्यक्त केलीये. लोकांनी माणूस आणि प्राणी यांच्या मैत्रीचं कौतुक केलंय. माकडाचे हे कृत्य ते कुटुंब स्तब्ध झाले. ही क्लिप शेअर करणाऱ्या अनेक युझर्सनी सांगितलं की, याचं शूटिंग श्रीलंकेतील बटाकालोआमध्ये करण्यात आलं आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अंत्यसंस्कार होत असलेल्या ठिकाणापासून माकडाला दूर नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, मात्र त्याने जाण्यास नकार दिला आहे.

तो त्या माणसाच्या मृत शरीराजवळ बसतो आणि वारंवार त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करतो. इतकंच नाही तर तो त्याच्या कपाळाचे चुंबन घेतो.

एकदा माकड आपला हात त्या माणसाच्या चेह-यावर नेऊन त्याला उठवायचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर याच्या व्हायरल क्लिप्स आहेत, ज्यातून असं दिसून येतं की, भावनांचा विचार केला तर माणूस आणि प्राणी यांच्यात काहीच फरक नाही. प्राणी सुद्धा मानवांना दु: खी पाहू शकत नाहीत.