
सध्या महाराष्ट्रासह देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे देशातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे डोंगरकड्यावर धबधबेही प्रवाहित झाले आहेत. याच निसर्गाच्या रौद्र सुंदर रूपाची प्रचिती देणारा एक अत्यंत धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका धबधब्यावर आनंद लुटायला गेलेल्या काही मुली भीषण अपघाताला बळी पडल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य जितके मनमोहक असते, तितकेच त्याचे रुप विनाशकारी असते. निसर्गाशी खेळणे हे किती महागात पडू शकते, याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून येत आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात ब्रेक घेऊन अनेक लोक निसर्गरम्य ठिकाणी फिरण्यासाठी जातात. पण अशाच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आणि साहसी ठिकाणी फिरण्याचे परिणाम किती वाईट असू शकतात, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ बिहारमधील गया जिल्ह्यातील प्रसिद्ध लंगुरी धबधब्यातील आहे. या व्हिडीओमध्ये काही मुली पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी धबधब्यावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्या मैत्रिणी एकत्र धबधब्याच्या मध्यभागी जाताना दिसत आहे. यात त्या मजा-मस्ती करताना पाहायला मिळत आहे. पण त्याचवेळी अचानक पाण्याची पातळी प्रचंड वेगाने वाढते आणि काही सेकंदात पूर येतो.
गया जी में संडे के छुट्टी मनाने गए थे,वाटरफॉल पर ।
लेकिन अचानक पानी का सैलाब इतना तेज हो गया की 6 बच्चियां बहने लगी, किसी तरह से उन्हें बचाया गया।
आप लोगों से आग्रह है, पूरे मानसून वाटरफॉल जाने से बच्चे। pic.twitter.com/K69IqkUEh9— The Bihar (@thebiharoffice) June 30, 2025
या धबधब्याच्या वाढत्या पुरामुळे त्यातील 6 मुली पाण्याच्या प्रवाहात वाहू लागल्या. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर घडली. यावेळी लोक जोरजोरात त्यांचा बचाव करण्यासाठी आणि मदतीसाठी आरडाओरड करताना दिसत आहे. पण पाण्याचा वेग इतका प्रचंड होता त्यांना वाचवण्यासाठी अनेकांना मेहनत करावी लागली.
या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. यावेळी एकाने कमेंट करत पावसाळ्यात लोकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे” असे म्हटले आहे. तर दुसऱ्याने “जेव्हा आपण निसर्गाच्या शक्तीला कमकुवत समजतो आणि तिच्याशी खेळू लागतो, तेव्हा असे घडते.” असे म्हटले आहे. पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी जाण्याचे धाडस करू नये, असा सल्लाही अनेकजण देत आहेत.