Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हद्दच केली! फोनवर गप्पा मारण्याच्या नादात बाई बाळाला पार्कमध्येच विसरली, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला फोनवर बोलताना पार्कमध्ये आपले बाळ विसरते. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हद्दच केली! फोनवर गप्पा मारण्याच्या नादात बाई बाळाला पार्कमध्येच विसरली, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
baby forgotten park viral videoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 3:26 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ खरोखरच धक्कादायक आहे. एक महिला फोनवर बोलण्यात इतकी मग्न झाली की तिला कळलेच नाही की ती तिच्या बाळाला पार्कमध्ये विसरली आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमुळे इंटरनेटवर मुलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि पालकांच्या जबाबदारीबद्दल एक नवीनच वाद सुरू झाला आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्याच वेळी, काही वापरकर्त्यांचा असा विश्वास आहे की हे स्क्रिप्टेड असू शकते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला फोनवर बोलत कुठेतरी जात आहे, तेव्हा एक पुरूष त्याच्या कडेवर एका बाळाला घेऊन त्या महिलेच्या मागे धावत येतो आणि म्हणतो “अरे मॅडम. तुम्ही तुमच्या बाळाला विसरलात. काय हे कोण करतं असं?’ असं म्हणत तो काहीतरी बडबडतो, हे पाहून, त्या महिलेला लगेच तिची चूक लक्षात आल्यावर ती पटकण आपल्या बाळाला आपल्याकडे घेते आणि लगेच मुलाला छातीशी घेऊन मिठी मारते.

आई म्हणून जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह

यानंतर तो माणूस त्या महिलेला म्हणतो, “अरे मॅडम, हे काय ते तुमचं मूल आहे ना?” हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. @gharkekalesh या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जसा हा व्हिडीओ व्हायरल झाला तशा नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रया देत, त्या महिलेवर प्रचंड टीका केली आहे. तसेच आई म्हणून तिच्या जबाबदारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच काही लोकांना आश्चर्य व्यक्त केलं आहे. एक आई असं कसं करू शकते असा प्रश्न उपस्थित केला आहे.

“ही निष्काळजीपणाची परिसीमा आहे”

एका नेटकऱ्यांने कमेंट केली आहे की, “ही निष्काळजीपणाची परिसीमा आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं की, जग फोनने इतकं वेडं झालं आहे की लोक त्यांच्या मुलांना पार्कमध्ये अशा प्रकारे विसरतायत”, तर एकाने कमेंट केली आहे की, “हा व्हिडिओ जुना आहे. ही क्लिप 2019 मध्येही हा व्हिडीओ व्हायरल झाला होता”,तर काहींनी दावा केला आहे की हा व्हिडीओ स्क्रिप्टेड असू शकतो.

पण हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे , जुना आहे की खरा आहे यापेक्षाही जे काही या व्हिडीओमध्ये दिसत आहे ते फार विचित्र आणि बेजबाबदारपणाचं असल्याचं नेटकरी म्हणतायत. तसेच हा व्हिडीओ पाहून सर्वांनीच संताप व्यक्त केला आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.