Video: तुम्हीच आहात, तुमच्या आयुष्याचे “फ्रंटमॅन”, स्क्विड गेम सीरिजचा व्हिडीओ वापरुन मुंबई पोलिसांचा अनोखा संदेश

| Updated on: Oct 16, 2021 | 3:32 PM

मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तुम्ही रस्त्यावर तुमच्या 'गेम'चे' फ्रंटमॅन 'आहात. तुम्हाला इथे खचून जाण्यापासून स्वतःला वाचवावे लागेल.

Video: तुम्हीच आहात, तुमच्या आयुष्याचे फ्रंटमॅन, स्क्विड गेम सीरिजचा व्हिडीओ वापरुन मुंबई पोलिसांचा अनोखा संदेश
तुम्हीच आहात तुमच्या आयुष्याचे फ्रंटमॅन- मुंबई पोलीसांचा संदेश
Follow us on

स्क्विड गेमचं (Squid Game) वेड आता देशभर लागलेलं दिसतं आहे, कारण या कोरिअन सीरिजचे अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत, असाच एक व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलीसांनी रस्ते सुरक्षेचा संदेश दिला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, तुम्ही रस्त्यावर तुमच्या ‘गेम’चे’ फ्रंटमॅन ‘आहात. तुम्हाला इथे खचून जाण्यापासून स्वतःला वाचवावे लागेल. म्हणूनच जेव्हा रेड लाईट दिसेल तेव्हा थांबा. हा ‘व्हिडिओ एका भीषण रस्ते अपघातावर संपतो. हा व्हिडिओ शेअर करण्यामागे मुंबई पोलिसांचा हेतू लोकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देणे आहे, जेणेकरून ते निष्काळजी राहून आपला जीव धोक्यात घालू नयेत.( Mumbai police now uses squid games red light green light scene for traffic advisory)

स्क्विड गेम नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली एक कोरिअन वेब सीरिज आहे, ज्यात लहान मुलांचे गेम मोठ्यांना खेळायला लावले जातात, आणि जे त्या गेममध्ये हारतात, त्यांना मारुन टाकलं जातं. हा गेम जिंकणाऱ्याला कोट्यवधीचं बक्षीस मिळणार असतं. त्यातील पहिल्या गेममध्ये ही बाहुली वापरण्यात आली आहे. ही बाहुली जोपर्यंत आपलं तोंड लपवून गाणं म्हणते आहे, तोपर्यंत हिरव्या रेषेपर्यंत पळायचं, आणि जेव्हा ती गाणं थांबवून मागे पाहते, तेव्हा जागेवर स्तब्ध राहायचं, अगदी पापणीही हलवायची नाही. या सीरिजमध्ये हरणाऱ्यांना थेट गोळ्या घालताना दाखवण्यात आलं आहे.

व्हिडीओ पाहा:

याच सीरिजच्या व्हिडीओचा वापर करत मुंबई पोलिसांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सिंग्नलवर रेड लाईट असताना थांबा, निघायची घाई करु नका, नाहीतर तुम्ही जीव गमवाल असा संदेश मुंबई पोलिसांनी यातून दिला आहे. यावेळी त्यांनी फ्रंडमॅन हा शब्द वापरला आहे, फ्रंटमॅन हा याच स्क्विड गेममधील एक पात्र आहे, जे या लोकांना गेम खेळवत असतं. म्हणजे कोण जगेल कोण मरेल किंवा गेम काय असेल हे फ्रंट मॅनला माहित असतं. त्याचप्रमाणे, मुंबई पोलिसांनीही तुम्हीच तुमच्या आयुष्याचे फ्रंटमॅन आहात असं म्हटलं आहे.

ही कोरिअन वेबसीरिज भारतीयांना खूपच आवडत आहे. भारतातून या सीरिजला सर्वाधिक व्हिव्हरशीप मिळाली आहे. सोशल मीडियावर या वेबसीरिजचे वेगवेगळा मिम्स बनत आहेत. याच ट्रेंडचा फायदा घेत, मुंबई पोलिसांचा नेटकऱ्यांपर्यंत पोहचण्याचा आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न आहे.

हेही पाहा:

Video: डिलीव्हरी बॉयचा भन्नाट डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सन!

Video: मोमोज गुजराती खाद्यपदार्थ असता तर..?, तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल!