Video: मोमोज गुजराती खाद्यपदार्थ असता तर..?, तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल!

हर्ष गोयंका यांनी आता एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. ज्यात एक व्यक्ती सांगत आहे की, जर मोमोज गुजराती खाद्यपदार्थ असता तर गुजराती लोक त्याच्यासोबत कसे वागले असते.

Video: मोमोज गुजराती खाद्यपदार्थ असता तर..?, तरुणाचा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल!
मोमोज प्रातिनिधीक फोटो

देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका सोशल मीडियाच्या जगात खूप सक्रिय आहेत. जेव्हाही हर्ष गोयनका काही मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात, तेव्हा त्यांचे फॉलोअर्स त्यावर भन्नाट कमेंट्स करतात. हर्ष यांनी आता एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. ज्यात एक व्यक्ती सांगत आहे की, जर मोमोज गुजराती खाद्यपदार्थ असता तर गुजराती लोक त्याच्यासोबत कसे वागले असते. (Harsh Goenka shared funny video goes viral on social media)

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, ही व्यक्ती मोमोज आणि गुजराती कनेक्शन याबद्दल सांगत आहे. हे ऐकल्यानंतर तुम्ही देखील मोठ्याने हसाल. गुजराती लोक व्यवसायात मागे नाहीत. हा व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना हर्ष गोयनकाने कॅप्शन दिले, ‘जर मोमोज गुजराती डिश असता तर …’ या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

व्हिडीओ पाहा:

सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. खरं तर, गरम मोमो खाणं कुणाला आवडत नाही. मोमोज सोबत असलेली लाल तिखट चटणी आणखीणच चवदार असते. हेच नाही तर मॅवनिजसोबत मोमो हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. पण जर कुणी म्हटलं की, मोमोज हा गुजराती पदार्थ असता तर. अशावेळी या मोमोजचं किती आणि कशाप्रकारे गुजराती लोकांनी कॉम्बिनेशन केलं असतं, हेच या व्हिडीओत सांगितलं जात आङे. हर्ष गोयंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक व्यक्ती सांगत आहे की जर लोक गुजराती खाद्यपदार्थ असतील तर लोक मोमोजशी कसे वागतील.

हेही पाहा:

Video: डिलीव्हरी बॉयचा भन्नाट डान्स सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, नेटकरी म्हणाले, हा तर मायकल जॅक्सन!

Video: प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, लहान मुलींचा हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI