भारतातल्या या गावात लग्नानंतर वधू 7 दिवस घालत नाही कपडे, ही अजब प्रथा नेमकी आहे तरी काय ?
Unique Wedding Rituals : भारतात लग्न आणि सणांच्या बाबतीत अनेक अनोख्या परंपरा पाळल्या जातात. प्रत्येक प्रदेशाची स्वतःची खास परंपरा असते, जी त्याचा सांस्कृतिक वारसा जपते. देशाच्या विविध भागात अशा काही परंपरा आहेत ज्या ऐकून, वाचून आपण हैराण होतो. अशाच एका विचित्र प्रथेबद्दल जाणून घेऊया...

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथल्या प्रत्येक प्रदेशात स्वतःच्या काही खास परंपरा आणि चालीरीती आहेत, ज्या स्थानिक लोकांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. अनेक ठिकाणी लग्नाच्या निमित्ताने खास प्रथा असतात,ज्या परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेल्या आहेत. मात्र, काही परंपरा इतक्या अनोख्या असतात की ज्याबद्दल ऐकून अथवा वाचून इतर लोक हैराण होतात. अशीच एक विचित्र आणि अनोखी परंपरा हिमाचल प्रदेशातील मणिकर्ण खोऱ्यातील पिनी गावात पाहायला मिळते.
पिनी गावातील परंपरा काय ?
हिमाचलमधील पिनी गावात लग्नानंतर वधूला सात दिवस कपडे न घालण्याची परंपरा पाळावी लागते. हो, हे खरं आहे. आणि ही परंपरा गावातील चालीरीतींचा एक भाग आहे, तेथील लोक त्या परंपरेचे पूर्ण भक्तीभावाने आणि विश्वासाने पालन करतात. या काळात वधू आणि वर एकमेकांपासून दूर राहतात आणि सात दिवस एकमेकांशी संपर्कही साधत नाहीत. या काळात वधूने फक्त कपडे घालायचे नाहीत असं नाही तर हा नियम तिच्यासाठी सामाजिक आणि धार्मिक कर्तव्य म्हणूनही पाहिला जातो. या सात दिवसांमध्ये वधू आणि वर दोघेही स्वतंत्र खोलीत राहतात आणि एकमेकांना भेटतही नाहीत.
श्रावण महिन्यातही महिलांसाठी विशेष नियम
या विचित्र परंपरेशिवाय पिनी गावातील महिलांसाठी श्रावण महिन्यात आणखी एक अनोखी परंपरा आहे. श्रावण महिन्यात गावातील महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत. एवढंच नव्हे तर या काळात पुरुषांना मांसाहार आणि नशा, दारू या गोष्टींपासून दूर राहावे लागते. असे केल्याने गावात सुख-समृद्धी टिकून राहते, अशी या गावातील लोकांची मान्यता आहे.
इतिहास आणि विश्वासाची कहाणी
पिनी गावात ही परंपरा खूप जुनी असून त्यामागे एक खास विश्वास निगडीत आहे. असं मानलं जातं की या गावाला राक्षसांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कपडे न घालण्याच परंपरा सुरू झाली होती. मात्र, आजच्या काळात ( गावातील) महिला या परंपरेदरम्यान अंगावर एखादं पातळ कापड घालतात, मात्र तरीदेखील ही परंपरा आजही पाळली जाते. स्थानिक लोक या परंपरेला आपल्या पूर्वजांचा वारसा मानतात आणि त्याच श्रद्धेने ते आजही भक्तीभावाने त्याचे पालन करतात. ही परंपरा केवळ कर्मकांड नसून त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचा एक भाग आहे, जी त्यांना त्यांच्या मुळाशी जोडते.
पिनी गावातील ही परंपरा म्हणजे भारतातील प्रत्येक गावाची स्वतःची वेगळी सांस्कृतिक ओळख असल्याचे उदाहरण आहे. येथील परंपरा या केवळ कर्मकांड नसून प्रेम, विश्वास आणि सामुदायिक बंधनाचे प्रतीक आहेत. खेड्यातील लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर या प्रथा त्यांच्या इतिहासाशी आणि सांस्कृतिक वारशाशी जोडलेल्या आहेत, आणि ते त्यांना केवळ आदर्श मानत नाहीत तर भविष्यातील पिढ्यांनी ते टिकवून ठेवावे यासाठी प्रेरितही करतात.
बाहेरील जगातील लोकांना जरी या परंपरा विचित्र वाटत असल्या तरी गावकरी मात्र अभिमानाने त्यांचा सांस्कृतिक वारसा मानतात. ही परंपरा केवळ पिनी गावाच्या संस्कृतीचाच भाग नाही तर भारतातील सांस्कृतिक विविधता देखील दर्शवते.
