कुणीच सुटणार नाही… घडायचं ते घडणारच आहे, त्या भविष्यवाणीचा जगाने का घेतला धसका?; असं काय…

प्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रेदामस, बाबा वंगा आणि अच्युतानंद यांच्या भविष्यवाण्यांचा हा लेख अभ्यास करतो. तीनही भविष्यवेत्त्यांनी तिसऱ्या महायुद्धाचा आणि महाकाय उल्कापिंडाच्या धोक्याचा उल्लेख केला आहे. तसेच, भारतात एका महान नेत्याच्या उदयाची आणि हिंदू धर्माच्या जागतिक प्रभावाची भविष्यवाणीही त्यांनी केली आहे. या

कुणीच सुटणार नाही... घडायचं ते घडणारच आहे, त्या भविष्यवाणीचा जगाने का घेतला धसका?; असं काय...
| Updated on: Aug 23, 2025 | 12:27 PM

फ्रान्सचा भविष्यवेक्ता मिशेल द नॉस्त्रादॅमस,भारताचे भविष्यवेक्ते संद अच्युतानंद दास आणि बुल्गारियाच्या बाबा वेंगा यांची भाकितं, भविष्यवाणी तर अनेकांनी ऐकली असेलच. पण एका भविष्यवाणीकडे फार कमी लोकांचं लक्ष गेलं असेल.
ती भविष्यवाणी अखेर आहे तरी काय ?

कॉमन भविष्यवाणी :

नॉस्त्रादॅमस आणि अच्युतानंद दोघांनीही असं म्हटलं होतं की अवकाशातून कोसळलेली एक महाकाय उल्कापिंड अनेक देशांना समुद्रात बुडवेल. दोघांनीही भारतात एका महान नेत्याच्या जन्माची भविष्यवाणी केली जो जग बदलेल. तर तिसरे महायुद्ध होईल असं तिन्ही भविष्यवेत्ते म्हणाले होते. बाबा वांगा यांच्या मते एक मोठे युद्ध होईल ज्यामध्ये ड्रॅगन जगातील सर्वात मोठी महासत्ता बनतील, परंतु आपण या भविष्यवाणीबद्दल चर्चा करत नाहीयोत तर दुसऱ्या भाकिताबद्दल बोलतोय.

ही भविष्यवाणी कोणीच टाळू शकत नाही

नॉस्त्रादॅमस : ‘महासागरांच्या नावावर असलेला धर्म चंद्रावर अवलंबून असलेल्या लोकांपेक्षा वेगाने वाढेल आणि त्यांना घाबरवेल, ‘सांप्रदायिकता आणि शत्रुत्वाच्या दीर्घ काळानंतर, सर्व धर्म आणि जाती एकाच विचारसरणीवर विश्वास ठेवू लागतील. ‘त्याचा जन्म तीन बाजूंनी वेढलेल्या समुद्री क्षेत्रात होईल, जो गुरुवारला त्याची सुट्टी म्हणून घोषित करेल. त्याची स्तुती आणि कीर्ती, शक्ती आणि सामर्थ्य वाढेल आणि जमीन आणि समुद्रावर त्याच्याइतका शक्तिशाली कोणीही नसेल.’ ‘पूर्वेचा तो नेता आपला देश सोडून इटलीचे पर्वत ओलांडून फ्रान्स पाहील. तो हवा, पाणी आणि बर्फाच्या वर जाईल आणि आपल्या काठीने सर्वांना मारेल. असं त्यांनी म्हटलं होतं.

अच्युतानंद : सर्व जण कृष्णाचे भक्त होतील. रशिया एक हिंदू राष्ट्र बनेल. रशियातील शेकडो लोक जगन्नाथजींच्या दर्शनासाठी येतील आणि भरपूर सोने अर्पण करतील. भविष्यवाणीनुसार, देशाची सूत्रे एका अविवाहित संताच्या हाती असतील. तो संपूर्ण क्षत्रप असेल. तो जगात सनातन धर्माची स्थापना करेल. जेव्हा गगन सिंहासनावर असेल आणि ओरिसाचा दिव्यसिंह राजा सिंहासनावर असेल, हे तेव्हा घडेल.

भविष्यवक्ता ऑर्थर चार्ल्स क्लार्क : ‘जसे सध्या संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय अमेरिकेत आहे, त्याचप्रमाणे संयुक्त ग्रह राष्ट्रांचे मुख्यालय मंगळ किंवा गुरू ग्रहावर असू शकते.’ १९८१ पर्यंत, भारत स्वतःमध्ये शक्तिशाली होईल आणि तिथून एक प्रचंड विचार क्रांती निर्माण होईल जी संपूर्ण जगावर प्रभाव पाडेल, असे त्यांनी म्हटले होते. संपूर्ण जग भारताचा धर्म आणि अध्यात्म स्वीकारेल. २० व्या शतकाच्या अखेरीस एक देश विज्ञानाच्या प्रगतीत इतर सर्व देशांना मागे टाकेल परंतु भारताची कीर्ती विशेषतः त्याच्या धर्म आणि तत्वज्ञानामुळे असेल, जी संपूर्ण जग स्वीकारेल असेही त्यांनी नमूद केलं होतं. 21 व्या शतकाच्या पहिल्या दशकात ही धार्मिक क्रांती संपूर्ण जगावर परिणाम करेल आणि मानवांना अध्यात्माकडे ढकलेल, असे लिहीले होते.

पीटर हार्कुस : ‘भारतात उठणारी अध्यात्म आणि धार्मिकतेची लाट संपूर्ण जगात पसरेल’ असं या शतकातील महान संदेष्टा पीटर हार्कुस यांनी त्यांच्या भविष्यवाणीत लिहिलं होतं.

क्रूजर: प्रसिद्ध फ्रेंच विद्वान क्रोझर यांनी भारताबद्दल म्हटले की, ‘जर पृथ्वीवर असा कोणताही देश असेल जो स्वतःला मानवजातीचे पालन करणारा किंवा प्रारंभिक संस्कृतीचे साक्षीदार म्हणून घोषित करण्यास पात्र असेल, ज्या देशाच्या संस्कृतीच्या किरणांनी प्राचीन जगाच्या सर्व भागात प्रकाश टाकला आहे, ज्याने मानवाला ज्ञानाच्या वरदानाने द्विज बनवले आहे, प्राकृतचे संस्कृतमध्ये रूपांतर केले आहे, तो देश खऱ्या अर्थाने भारतवर्ष आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

जूल्स वर्ने : विज्ञान कथा लेखक ज्युल्स यांच्या मते, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल. बांगलादेशची निर्मिती होईल. शेवटी, पाकिस्तान एका लहान बेटात बदलेल. त्याचा काही भाग अफगाणिस्तान घेईल आणि काही भाग स्वतंत्र बलुचिस्तान बनेल, असं त्यांनी नमूद केलं होतं. भारत चीनकडून घेतलेली जमीन परत मिळवू शकेल. या वेळेपर्यंत तिबेट देखील स्वतंत्र होईल. श्रीमंत देशांना हर्षल, प्लूटो इत्यादी ग्रहांबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि माणूस शुक्र आणि मंगळावर पोहोचेल. भारत एक अतिशय शक्तिशाली देश म्हणून उदयास येईल. जगात त्याचा आदर वाढतच जाईल असंही त्यांनी लिहीलं होतं.

लियो टॉल्स्टॉय (1828-1910): ज्ञान आणि बुद्धीचे मिश्रण असल्याने एके दिवशी फक्त हिंदू आणि हिंदुत्वच संपूर्ण जगावर राज्य करतील.

अल्बर्ट आइनस्टाइन (1879-1955): मला असं वाटतं की हिंदूंनी त्यांच्या बुद्धिमत्तेद्वारे आणि जाणीवेद्वारे, ते काम केलं आहे जे यहूदी करू शकले नाहीत; केवळ हिंदू धर्मातच अशी शक्ती आहे ज्याद्वारे शांतता स्थापित केली जाऊ शकते.

मायकल नॉस्ट्रॅदॅम (1503-1566): ‘हिंदू धर्म युरोपमध्ये सत्ताधारी धर्म बनेल आणि उलट, युरोपातील एक प्रसिद्ध शहर हिंदूंची राजधानी बनेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. )