AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यू येण्यापूर्वी दिसतात लक्षणे, नर्सने सोशल मीडियावर केला दावा

कधी कधी एखादी व्यक्ती मरत असताना त्याची नजर खोलीच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर किंवा एखाद्या भागावर टेकलेली असते. जणू तो टक लावून पाहतोय. कधीकधी अशा परिस्थितीत लोक हसत असतात आणि त्याच वेळी त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलत असतात

मृत्यू येण्यापूर्वी दिसतात लक्षणे, नर्सने सोशल मीडियावर केला दावा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 19, 2024 | 2:29 PM
Share

death stare truth | जन्म आणि मृत्यू हे अतूट सत्य आहे. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येक प्राणी अन् वनस्पतीचा मृत्यू होणारच आहे. मृत्यूनंतर काय होतो? यासंदर्भात माहिती गरुड पुराणात दिली आहे. त्यानंतरही अनेक जण मृत्यू कसा येतो हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अमेरिकीतील एका नर्सने मृत्यूसंदर्भात दावा केला आहे. मृत्यू पूर्वी चार घटना प्रत्येक जण पाहतो, असा दावा तिने केला आहे. 41 वर्षीय जुली मॅकफॅडेन हिने सोशल मीडियावर एका व्हिडिओतून हा दवा केला आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोण आहे ती नर्स

जुली मॅकफॅडेन लॉस एंजिल्समधील एका रुग्णालयात काम करते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर आहेत. जेव्हा कोणाचा मृत्यू होणार असले, तेव्हा तिला या घटना समजतात. तिने यासंदर्भात चार घटनांचा उल्लेख केला आहे.

ज्युलीने एका YouTube व्हिडिओमध्ये स्पष्ट केले होते की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू होणार आहे, त्याच्या काही आठवड्यांपूर्वी त्याला एखाद्या प्रिय व्यक्तीला दिसतो. तो त्यांच्याशी संवाद साधत असल्याचा अनुभव येतो.

ज्युली हिने पुढे जाऊन टर्मिनल ॲसिडिटी बद्दल म्हणते. ती म्हणते, आमच्या सर्व रुग्णांपैकी 30 टक्के लोकांमध्ये हा प्रकार आढळते. त्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होण्याआधी एक छोटासा उर्जेचा स्फोट होतो. जर कोणी खूप आजारी असेल, तर त्याच्या शरीरात ऊर्जेचा स्फोट होतो आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. काही रुग्णांना असे का घडते हे कोणालाही माहिती नसले तरी, ज्युली ही एक सामान्य रहस्यमय घटना मानते.

ज्युली स्पष्ट करते की ‘द डेथ रीच’ नावाची एक घटना घडते जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो आणि त्याला असे वाटते की तो मरण्यापूर्वी वर पोहोचला आहे आणि तो कोणाकडे पाहत आहे किंवा कोणालातरी धरून आहे किंवा कोणालातरी मिठी मारत आहे.

ज्युली तिच्या व्हिडिओमध्ये सांगते की, कधी कधी एखादी व्यक्ती मरत असताना त्याची नजर खोलीच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर किंवा एखाद्या भागावर टेकलेली असते. जणू तो टक लावून पाहतोय. कधीकधी अशा परिस्थितीत लोक हसत असतात आणि त्याच वेळी त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीशी बोलत असतात, परंतु त्यांचे डोळे त्याच गोष्टीकडे टक लावून असतात. ज्युलीचा दावा आहे की मृत्यूकडे टक लावून पाहणे हे पूर्णपणे सामान्य आहे. हे दर्शविते की रुग्ण आरामदायक आणि आनंदी आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा