AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे बापरे, रातोरात एक डोळा गायब झाला, रात्री गाढ झोपला, सकाळ झाली तर एक डोळा नव्हता

त्याने डोळे उघडून पाहीले तर त्याचे एका डोळ्याचे बुबुळ पांढरे झाले होते, डॉक्टरांनी डोळे तपासून त्याला सांगितले की त्याचा एक डोळा पॅरासाईटने खाल्ला आहे.

अरे बापरे, रातोरात एक डोळा गायब झाला, रात्री गाढ झोपला, सकाळ झाली तर एक डोळा नव्हता
EYEImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 18, 2023 | 5:50 PM
Share

नवी दिल्ली : समजा आपण रात्री झोपलो आणि सकाळी उठून पाहीले की आपला एक अवयव रातोरात गायब झाला आहे, तर आपली काय अवस्था होईल. असाच धक्कादायक प्रकार एका 21 वर्षीय तरूणाच्या बाबतीत घडला आहे. रात्रीचा हा २१ वर्षीय मुलगा गाढ झोप आल्याने रात्री झोपला आणि त्याच्या सोबत अशी काही विचित्र घटना घडली की त्यास समजलेच नाही. वास्तविक हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरीया येथील आहे. काय झाले नेमके या मुला बाबत हे पाहूयात…

अमेरिकेच्या फ्लोरीडा राज्यातील मायकल क्रुंम्होल्ज याच्याबाबतीत एक विचित्र घटना घडली आहे. हा एकवीस नागरिक तरूण रात्रीचा लेन्स घालून झोपला. तेव्हा एका दुर्मिळ परजीवी किड्याने त्याच्या डोळ्याचे बुब्बुळ खाऊन टाकल्याचे उघडकी आले आहे.

माईक हा गेल्या सात वर्षांपासून डोळ्यांना कॉण्टेक्ट लेन्स लावत आहे, कॉण्टेक्ट लेन्स लावणारे लोक रात्रीचे लेन्स काढून झोपतात. परंतू त्या रात्री लेन्स काढायला तो विसरला. त्या रात्री त्याची चुक त्याला खूपच भारी पडली. त्याने सकाळी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खूपच वेदना झाल्या. त्यानंतर असे उघडकीस आले आहे की एका पॅरासाईट परजीवीने त्याच्या डोळ्याचा भाग खाल्ला. हे परजीवी मानवी अवयव खातात. त्यामुळेच एक डोळा त्याला गमवावा लागला आहे.

सकाळी मायकलला डोळा उघडताना खूपच वेदना झाल्या, मग त्याने डोळे उघडून पाहीले तर त्याचे एका डोळ्याचे बुबुळ पांढरे झाले होते, डॉक्टरांनी डोळे तपासून त्याला सांगितले की त्याचा एक डोळा पॅरासाईटने खाल्ला आहे. तेव्हा त्याला विश्वासच बसेना, परंतू त्याला अखेर आपल्याला एक डोळा नाही यावर विश्वास ठेवावा लागला. त्याच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतू त्याची दृष्टी काही परत आली नाही. शेवटी त्याला आता त्याचे काम देखील नीट करता येत नाही. त्याला कायमचे एका डोळ्याने काम करावे लागेल. वास्तविक आपण जेव्हा डोळ्यांना लेन्स लावतो. तेव्हा आपल्या जलन किंवा खाज येत असते. त्यामुळे दर चार ते पाच तासांनी लेन्स काढावी लागते. झोपताना कोणत्याही परिस्तितीत झोपताना लेन्स काढूनच झोपले पाहीजे.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला