Video : पोळी भाजी नव्हे, इंजिन ऑईल पिऊन हा माणूस करतो गुजारण, दररोज रिचवतो इतक्या बाटल्या !
Viral video : शिवमोगा येथे राहणारा हा इसम गेल्या 30 वर्षांपासून अन्नाऐवजी इंजिन ऑइलवर जगत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये बाटलीमधून चक्क इंजिन ऑइल पिताना दिसतोय.

जगात अनेक तऱ्हेची माणसं असतात, काही साधी-भोळी, काही खट्याळ तर काही अतरंगी. सोशल मीडियावरही अशा काही माणसांचे किस्से, फोटो, व्हिडीओ फिरत असतात. पण सध्या जो व्हिडीओ समोर आलाय तो पाहून तर तुम्ही डोक्यालाच हात लावाल. कर्नाटकातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जिथे एका माणसाने आपल्या खाण्याच्या सवयींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. असा दावा केला जातोय की हा माणूस पोळी-भाजी, भात आमटी असे सामान्य अन्न खात नाही, तर तो इंजिन ऑइलवरच जगतो. हो, बरोबर आहे… इंजिन ऑइलवर जगणारा माणूस अशीच त्याची ख्याति आहे.
सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर एक रील समोर आल्यावर, त्या माणसाची गेल्या अनेक दशकांपासूनची ही जुनी सवय व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीस वर्षांपासून त्याच्या आहारात इंजिन ऑइलचा समावेश आहे.
ऑईल कुमार पितो इंजिन ऑईल
सोशल मीडिया पोस्टनुसार, कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील रहिवासी असलेला हा माणूस आजूबाजूच्या परिसरात ऑइल कुमार म्हणून ओळखला जातो. असा दावा केला जातो की तो दररोज अंदाजे 7 ते 8 लिटर इंजिन ऑइल सेवन करतो. एवढंच नव्हे तर तो नियमितपणे चहा देखील पितो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, आजूबाजूचे लोक ऑइल कुमारला प्रेमाने जेवण देताना दिसत आहेत, परंतु त्यानंतरही तो त्यांना नकार देत बाटलीतून इंजिन ऑइल पिताना दिसतोय.
View this post on Instagram
ना आजार , ना काही त्रास
या पोस्टनुसार, अनेक दशके इंजिन ऑइल प्यायल्यानंतरही, ऑइल कुमार यांना कधीही रुग्णालयात दाखल करावे लागले नाही किंवा त्यांना कधीही कोणत्याही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला नाही,कोणताही त्रास त्यांना झाला नाही. इतकेच नव्हे तर, ऑइल कुमारचा असा विश्वास आहे की त्याचं हे जीवन भगवान अय्यप्पांच्या आशीर्वादामुळे आहे. दैवी मदतीशिवाय, अशा असामान्य आहारावर कोणीही जगणे अशक्य आहे असा दावा त्याने केला.
खरंतर इंजिन ऑइल हे काही मानवी वापरासाठी किंवा सेवन करण्यासाठी नाही. ते प्यायल्याने, सेवन केल्याने एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत आरोग्याला हानी पोहोचू शकते आणि मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे अशा उपक्रमांपासून दूर राहावे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
