कामचुकारांनो सावधान! कामावरून केवळ एक मिनिट आधी निघाली, थेट कामावरूनच काढलं; कोर्टात जे सांगितलं…
चीनमधील एका तरुणीला केवळ एक मिनिट आधी ऑफिसमधून निघाल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले. तिने असे आधीही अनेक वेळा केले होते. तरुणीने न्यायालयात धाव घेतली, जिथे कोर्टाने कंपनीचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आणि कंपनीने वॉर्निंग देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

आधी लोक नोकरी मिळवण्यासाठी खटपटी करतात. प्रत्येक ऑफिसचे उंबरठे झिजवतात. नोकरी मिळत नाही म्हणून व्यवस्थेला शिव्या देतात. काही लोक तर नशिबालाच दोष देतात. पण नोकरी मिळाल्यावर काय होतं? नोकरी मिळाल्यावर काही लोक सतत कामात चुका करतात, ऑफिसात झोपा काढतात, दिलेलं टार्गेट पूर्ण करत नाहीत, शिफ्ट पाळत नाहीत, शिफ्ट बदलली तरी त्यांची कुरकुर सुरू असते, ही लोकं वेळेत येत नाहीत, पण निघतात मात्र वेळेत. काही बहाद्दर तर असे आहेत की वेळेच्या आधीच घरी पळायचं बघतात. पण एका तरुणीला वेळेच्या आधी घरी पळणं चांगलंच भोवलं. तिला तिच्या कंपनीने थेट कामावरून काढलं. त्यामुळे ही तरुणी कोर्टात गेली, पण तिथेही…
एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात भीतीदायक काय असू शकतं? त्याची नोकरी जाणं हे त्याच्यासाठी अधिक भीतीदायक असू शकतं. पण ऑफिसातून एक मिनिट आधी निघालं म्हणून नोकरी गेली असेल तर…? तर ही गोष्ट निश्चितच त्या व्यक्तीसाठी धक्कादायक असू शकते. चीनमधील एक प्रकरण सध्या अशाच एका कारणाने चर्चेत आलं आहे. एक महिला कर्मचारी केवळ एक मिनिट आधी निघाली. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. या तरुणीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी केवळ एका मिनिटासाठी गेली आहे. सध्या चीनमध्ये या गोष्टीची भलतीच चर्चा सुरू आहे.
वाचा: सासूने जावयासोबत पळून जाण्याचा बनवला मास्टर प्लान, नवऱ्याला कळालं अन्…
एकदा नव्हे सहावेळा
चीनच्या ग्वांगझोउ येथील ही घटना आहे. येथील एका कंपनीत वांग नावाची एक तरुणी काम करत होती. तिला कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. कारण एक मिनिट आधी ती कामावरून निघाली म्हणून तिला कामावरून काढून टाकलं आहे. ही बातमी कळल्यावर लोकांनाही वाईट वाटलं. त्यावर तरुणीच्या बाजूने कमेंट आल्या. पण जेव्हा या तरुणीची खरी माहिती समोर आली तेव्हा सर्वांना धक्काच बसला. या तरुणीने पहिल्यांदाच असं केलं नाही तर महिन्यातून किमान सहावेळा तिने असा प्रकार केला आहे. सहावेळा ती वेळेच्या आधीच घरी गेली आहे. वांग ही गेल्या तीन वर्षापासून या कंपनीत काम करत होती. तिचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला होता. पण जेव्हा कंपनीने कॅमेरे चेक केले तेव्हा वांग एक मिनिट आधीच घरी गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे तिच्यासाठी ही गोष्ट अडचणीची ठरली.
कोर्ट म्हणाले…
कंपनीने कॅमेरे अचानक चेक केले तेव्हा हे प्रकरण समोर आलं. वांगला कामावरून काढून टाकल्यानंतर ती कोर्टात गेली. त्यावेळी न्यायालयाने निर्णय देताना वांगची बाजू घेतली. एखादी व्यक्ती एक मिनिट आधी ऑफिसमधून बाहेर पडली म्हणून त्याला नोकरीवरून काढता येत नाही. अशा कारणासाठी कामावरून काढलं जाणं ही कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी दुर्देवी गोष्ट असेल. असा निर्णय घेण्यापूर्वी कंपनीने तिला वॉर्निंग द्यायला हवी होती. त्यानंतरही तिने ऐकलं नसतं तर तिला कामावरून काढलं जाऊ शकलं असतं, असं कोर्टाने म्हटलं आहे.
