Optical Illusion | या चित्रात पिझ्झा शोधून दाखवा!
ऑप्टिकल भ्रम सोडवणं सोप्पं नसतं यासाठी तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. हे एक प्रकारचं कोडं असतं, या कोड्यात जे उत्तर आपल्याला शोधायला सांगितलेलं असतं ते लवकरात लवकर शोधून काढायचं असतं. ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप व्हायरल होतायत. जर तुम्ही रोज एक ऑप्टिकल भ्रम सोडवलंत, सराव केलात तर तुम्हाला ही कोडी सोपी वाटतील.
मुंबई: लहानपणी आपण कोडी सोडवायचो, ही कोडी ऑफलाईन असायची. लोक तोंडी प्रश्न विचारायचे आणि आपणसुद्धा तोंडी उत्तर द्यायचो. ही कोडी जो आधी सोडवेल तो हुशार ठरायचा. ऑप्टिकल इल्युजन सुद्धा असंच काहीसं आहे. ही चित्रे खूप किचकट असतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. चित्र बघून आपल्याला जे दिसतं तेच सत्य असेल असं नसतं आपल्याला एकप्रकारचा भ्रम होतो म्हणून या चित्रांना ऑप्टिकल भ्रम म्हणतात. यात अनेक प्रकार असतात. यात कधी आपल्याला एखादा अंक शोधायचा असतो तर कधी एखादी लपलेली वस्तू. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर लगेच उत्तर सापडतं. कोडं असल्याने आधी आपण गोंधळून जातो पण मन एकाग्र करून, डोकं शांत ठेऊन उत्तर शोधणं सहज शक्य आहे.
पिझ्झा स्लाईस शोधा
हे चित्र बघा. यात तुम्हाला ऑम्लेट, केळी, डोनट असे खूप पदार्थ दिसतील. या सगळ्यांमध्ये तुम्हाला पिझ्झा शोधायचा आहे. पिझ्झा म्हणजे तुम्हाला यात संपूर्ण पिझ्झा नाही तर, पिझ्झाची स्लाईस शोधायची आहे. यात असंख्य गोष्टी दिसून येतायत त्यामुळे चित्र बघून आधी आपण गोंधळून जातो. एक एक वस्तू बघितली तर तुम्हाला पिझ्झा नक्कीच सापडेल. तुम्हाला पिझ्झा आवडत असेल ना? यात स्लाईस शोधायची म्हणजे तुम्हाला आधी ते काय आहे हे माहिती असायला हवं.
आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत
कोल्ड कॉफी, कोल्ड ड्रिंक, बर्गर, डोनट, सूप, ऑमलेट हे तर तुम्हाला चित्रात दिसून आलंच असेल. आता शोधायचा आहे पिझ्झा! आम्ही तुम्हाला सांगतो उत्तर कसं शोधायचं? यात खूप गोष्टी असल्यानं गोंधळून जाऊ नका. आधी हे चित्र नीट बघा, शांत व्हा, प्रश्न वाचा! यात तुम्हाला काय शोधायचं आहे हे एकदा कळलं की उत्तर शोधणं पण सोपं जातं. तुम्हाला पिझ्झा शोधायचा आहे, पिझ्झा स्लाईस! चला डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे नजर फिरवा. वरून खाली एक एक पदार्थ पटकन बघा. उत्तर सापडलं? सापडलं असेल तर अभिनंदन! नसेल सापडलं तर आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.