Video: पाकिस्तानी मुलींचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल, एकमेकींबद्दल प्रेम व्यक्त केल्याने कट्टरतावाद्यांकडून ट्रोल

संदल खटाकसोबत हरीमचा जो व्हिडिओ लोकांच्या आवडीचे कारण बनला आहे, त्यात दोन्ही टिकटॉक स्टार्स एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहेत.

Video: पाकिस्तानी मुलींचा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल, एकमेकींबद्दल प्रेम व्यक्त केल्याने कट्टरतावाद्यांकडून ट्रोल
सुंदल खटक टिकटॉककर हरीमची 'गर्लफ्रेंड' असल्याचा दावा केला जात आहे

पाकिस्तानची वादग्रस्त टिकटॉक स्टार हरीम शाह पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खरं तर, अलीकडेच तिने टिकटॉकर संदल खटाकसोबतचा एक खाजगी व्हिडिओ शेअर केला होता, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात दोघीही एकमेकींना किस करताना दिसत होत्या. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, हरीमने स्वतः हा व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता, ज्यावर खूप गोंधळ निर्माण झाल्यानंतर, तिने तो डिलीट केला. आता पुन्हा एकदा हरीम आणि संदलचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( pakistan tiktok star hareem shah and sundal khattak new videos goes viral Expressed love for each other from the video)

यावेळी सोशल मीडियावर, संदल खटाकसोबत हरीमचा जो व्हिडिओ लोकांच्या आवडीचे कारण बनला आहे, त्यात दोन्ही टिकटॉक स्टार्स एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये, दोघीही गाणं म्हणत, एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ हरीम शाहने हिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून एक दिवस आधी शेअर केला आहे. लोकांना त्यांचा हा व्हिडिओ खूप आवडत आहे.

पाहा व्हिडीओ:

 

एका दाव्यानुसार, सुंदल खटक टिकटॉककर हरीमची ‘गर्लफ्रेंड’ असल्याचा दावा केला जात आहे. म्हणूनच ही बातमी ऐकून पाकिस्तानातील अनेक लोक भडकले आहेत. हरीम असे लहान-लहान व्हिडीओ बनवते, जे इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होतात. हरीम शाहची फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. तिच्या टिकटॉक अकाऊंटवर 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हरीम शाह आणि वाद हे जुनच समीकरण आहे. एकदा तिने घाणेरडी आणि अश्लील भाषा वापरल्याबद्दल मुफ्ती कवीच्या थोबाडीत मारली होती. हरीम शाह हीने वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. त्यानंतरच तिची लोकप्रियता वाढली.

हरीम आणि संदलचे आणखी व्हिडीओ:

 

हेही पाहा:

Video: जेरीने टॉमला ‘जेरीस’ आणलं, अगदी समोर बसुनही उंदराने मांजराला गंडवलं, पाहा व्हिडीओ

Video: ‘मेरे प्यारे साथियो’ म्हणत कॉमेडियन श्याम रंगिलाकडून मोदींची भन्नाट मिमिक्री, व्हिडीओ तुफान व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI