AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकरी ईदला मुक्या प्राण्याची बळी, ढसाढसा रडला मुलगा; म्हणाला, ‘माझ्या बकऱ्याला…’ Video व्हायरल

Pakistan Viral Video: संपूर्ण महिना दिलं प्राण्याला प्रेम आणि बकरी ईदला मुक्या प्राण्याची बळी, बळी दिल्यानंतर ठसाठसा रडला मुलगा, म्हणाला, 'माझ्या बकऱ्याला...' व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

बकरी ईदला मुक्या प्राण्याची बळी, ढसाढसा रडला मुलगा; म्हणाला, 'माझ्या बकऱ्याला...' Video व्हायरल
| Updated on: Jun 11, 2025 | 12:02 PM
Share

Pakistan Viral Video: बकरी ईद ज्याला ईद-उल-अजहा असं देखील म्हणतात. बकरी ईद मुसलमान बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव प्राण्यांची बळी देतात. यंदाच्या वर्षी 7 जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात आली. दरम्यान बकरी ईदचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक जण लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देखील देत आहेत.

व्हिडीओमध्ये एका पाकिस्तानी मुलगा ढसाढसा रडताना दिसत आहे. बकरी ईदच्या दिवश बकऱ्याची बळी दिल्यामुळे पकिस्तानी मुलगा रडताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये मुलगा कुटुंबियांना म्हणतोय, ‘माझ्या पहिल्या बकऱ्याला मारलं…’ यावर कुटुंबिय म्हणतात, ‘आम्ही सांगितलं होतं ना, बकऱ्याला अल्लाहकडे जायचं आहे. म्हणून त्याची बळी देण्यात आली… बकरा आता अल्लाहला तुझ्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सांगेल… त्यानंतर अल्लाह तुला चांगल्या भेटवस्तू देखील देतील…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये कुटुंबिया मुलाची समज घालताना दिसत आहेत. पण तरी देखील मुलाचं रडणं काही थांबत नाही. मुलगा रडतो आणि म्हणतो, ‘माझ्या बकऱ्याला सुरीने कापलं. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.’ असं सांगत असताना मुलगा हातवारे देखील करून दाखवत आहे. शिवाय डोळे देखील पुसताना दिसत आहे.

मुलाचं दुःख पाहून कुटुंबातील सदस्यांना खूप दुःख झालं. मात्र, तो मुलगा कोणाचेही ऐकायला तयार नव्हता आणि तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता की माझी बकरी कापली गेली. पाकिस्तान अनटोल्ड या अकाउंटवरून व्हिडीओ एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे.

मोरोक्कोमध्ये बळी देण्यावर बंदी

सांगायचं झालं तर, बकरी ईदनिमित्त, पाकिस्तान सरकारने तेथे राहणाऱ्या अहमदिया मुस्लिमांना कुर्बानी देण्यास बंदी घातली होती. जर कोणी कुर्बानी देताना आढळलं तर त्याला 5 लाख रुपये दंड भरावा लागेल अशी घोषणा त्यांनी केली होती. यासाठी, ते प्रत्येक अहमदिया मुस्लिमांच्या घरी गेले आणि कोणत्याही अहमदियाच्या घरी प्राणी आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय मुस्लिम देश मोरोक्कोमध्ये मेंढ्यांच्या कुर्बानीवरही बंदी घालण्यात आली होती. याचं कारण म्हणजे गेल्या 6 वर्षांपासून मोरोक्कोमधील लोक दुष्काळाचा सामना करत आहेत. या प्रसंगी राजा मोहम्मद सहावा यांनी दोन मेंढ्यांचे बलिदान दिले. यातील एक बलिदान स्वतःसाठी होते. दुसऱ्या मेंढ्याचे बलिदान संपूर्ण देशाच्या वतीने देण्यात आले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.