Video : अमेरिकन डॉलरचा पाऊस ते नणंदच्या लग्नाची जबाबदारी, पाकिस्तानी महिलेच्या हवेतल्या बाता

"माझ्या लग्नात हेलिकॉप्टरमधून अमेरिकन डॉलरचा वर्षाव होईल", असं महिला व्हिडीओत बोलताना दिसत आहे (Pakistani woman shares fantasies about her lavish marriage on social media).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:18 PM, 26 Jan 2021
Video : अमेरिकन डॉलरचा पाऊस ते नणंदच्या लग्नाची जबाबदारी, पाकिस्तानी महिलेच्या हवेतल्या बाता

कराची (पाकिस्तान) : आपलं लग्न मोठ्या जल्लोषात व्हावं, आपला लग्न सोहळा उपस्थितांच्या कायम लक्षात राहावा, अशी अनेकांची इच्छा असते. अनेकजण तशाच प्रकारचं लग्न आयोजित देखील करतात. मात्र, आपल्या लग्नाची स्वप्न कुणी सोशल मीडियावर सहजपणे सांगत नाही. पाकिस्तानच्या एका महिलेने तिचं लग्न किती जल्लोषात आणि थाटात करणार, याबाबत ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करत माहिती दिली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेकांनी तिला ट्रोल देखील करण्याचा प्रयत्न केला आहे (Pakistani woman shares fantasies about her lavish marriage on social media).

महिलेने आपलं लग्न कसं होणार, या बाबतची इच्छा सांगणारा व्हिडीओ याआधी शेअर केला होता. त्या व्हिडीओवरुन लोकांनी तिला तुफान ट्रोल केलं. त्यानंतर महिलेने पुन्हा दुसरा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत तिने ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. मला लग्नाबाबत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माझ्या टीका करणाऱ्यांनी खिल्ली उडवणाऱ्यांनी शाळेत जावं, असं महिला म्हणाली.

“माझ्या लग्नात हेलिकॉप्टरमधून अमेरिकन डॉलरचा वर्षाव होईल”, असं महिला व्हिडीओत बोलताना दिसत आहे. महिला स्वत:ला बाजवा जातीची असल्याचा उल्लेख करत आहे. याशिवाय आपली ननंद जर अविवाहित असेल तर तिच्या लग्नाची जबाबदारीदेखील घेण्यास तयार असल्याचं महिला व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

सोशल मीडियावर महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक व्हिडीओ बघून खूप हसत आहेत. महिलेच्या या व्हिडीओमुळे लाखो लोकांचं मनोरंजन होत आहे (Pakistani woman shares fantasies about her lavish marriage on social media).

हेही वाचा : प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना शिल्पा शेट्टीकडून घोडचूक; नेटिझन्सनी झापलं