Video: ट्रेनमध्ये सीट न मिळाल्यामुळे प्रवाशाने लढवली शक्कल, जे काही केलं ते पाहून पाहात बसले लोक
सोशल मीडियावर एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सीट न मिळाल्याने त्याने केलेला अनोखा जुगाड पाहून सर्वजण चकीत झाले.

भारतीय लोकांच्या प्रत्येक समस्येवर जुगाड हा उपाय असतो. आपल्या देशातील जनता जुगाड वापरून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवते. किंवा एखाद्या कामासाठी जास्त पैसा किंवा जास्त वेळ लागत असेल तर लोक जुगाड करून ते काम अगदी सोपे करतात. या जुगाडाचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. हे व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे घडले आणि लोकांच्या मनात अशा कल्पना येतात कुठून? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने ट्रेनमध्ये बसायला जागा न मिळाल्याने अनोखी शक्कल लढवली आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ट्रेनच्या सामान्य बोगीचा असल्याचे बोलले जात आहे. या बोगीमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे बसायलाही जागा नाही. पण एका व्यक्तीने मात्र झोपण्यासाठी स्वत:साठी वेगळा बर्थ बनवला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रेनच्या डब्याच्या आत छताजवळ दोन्ही बाजूंच्या जाळ्यांचा वापर करून नायलॉन दोरीच्या मदतीने खाटेसारखे जाळे तयार करतो. हे जाळे हुबेहुब आरामदायी झुल्यासारखे दिसत आहे.
View this post on Instagram
जेव्हा त्याचे हे जाळे विणून पूर्ण होते तेव्हा तो त्यावर एक घोंगडी व त्याचे सामान ठेवतो. नंतर वर चढून त्यावर आरामात झोपतो. त्याचा हा पराक्रम पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत सध्या माहिती उपलब्ध नाही. पण हा व्हिडीओ थोडा जुना असल्यचे म्हटले जात आहे.
हा व्हिडीओ ‘_ya5een.__’ नावाच्या एका यूजरने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, ‘सामान्य कंपार्टमेंट आयटम’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 50 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 1 लाख 73 हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक कमेंट करताना दिसत आहेत. एका यूजरने, ‘मलाही माझ्या आयुष्यात असा आत्मविश्वास हवा आहे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘एखादी व्यक्ती न घाबरता इतरांना त्रास देते आहे हे व्यवस्थेचे अपयश आहे.’ तिसऱ्या यूजरने, ‘भाऊ स्वतःच्या स्लीपर सीटने प्रवास करतो’ असे म्हटले आहे.
