मी एक नाही, दोन नाही तर 100 मुलांचा ‘बाबा’; Telegram च्या CEO ने उडवून दिली खळबळ

Pavel Durov CEO of Telegram : टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. मी एक नाही, दोन नाही तर 100 मुलांचा 'बाबा' असल्याचा दावा दुरोव यांनी केला आहे. जगातील 12 देशांमध्ये आपली मुलं असल्याचे त्यांनी सांगितले.

मी एक नाही, दोन नाही तर 100 मुलांचा 'बाबा'; Telegram च्या CEO ने उडवून दिली खळबळ
Pavel Durov CEO of Telegram
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 9:13 AM

टेलिग्रामचे संस्थापक Pavel Durov ने एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. मी एक नाही, दोन नाही तर 100 मुलांचा ‘बाबा’ असल्याचा दावा दुरोव यांनी केला आहे. याविषयी त्यांनी टेलीग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. त्यानुसार जगातील 12 देशांमध्ये आपली मुलं असल्याचा दावा त्याने केला आहे. अर्थात तो या मुलांचा जैविक पिता (Biological Father) आहे. स्पर्म डोनेट केल्याने अनेक महिलांना आई होण्याचा आनंद मिळाल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

’15 वर्षांपूर्वी सुरु झाला प्रवास’

टेलिग्रामवर Pavel Durov वर त्यांनी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आपण 100 हून अधिक मुलांचे पिता असल्याचे सांगितले आहे. ज्याने कधी लग्न केले नाही. त्याला एकटे राहणे आवडते, त्या व्यक्तीला हे कसे साध्य झाले, असा प्रश्न अनेकांना पडला असेल, असे ते म्हणाले. या घटनेची सुरुवात 15 वर्षांपूर्वी झाल्याचे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मित्रांनी स्पर्म डोनेट करण्यास सांगितले

टेलिग्राम पोस्टमध्ये पॉवेल यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यानुसार 15 वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राला मुल होण्यात अडचण होती. त्यानंतर पॉवेल याने त्याचे शुक्राणू दिले. त्यावेळी त्याचे शुक्राणू योग्य असल्याचे डॉक्टरांनी त्याला सांगितले. त्याला ही गोष्ट आवडली. सुरुवातीला हा प्रकार विचित्र वाटला. पण आईपणासाठी त्याची अशी मदत होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला समाधान वाटले.

Pavel Durov ने काही दिवसानंतर स्पर्म डोनेट करणे थांबवले. पण सध्या जगभरातील 12 देशांमध्ये त्यांचे 100 हून अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याचा दावा त्याने या पोस्टमध्ये केला आहे. आता त्याने यापुढे नवीन काही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वत-च्या डीएनए चा ओपन सोर्स करण्याची त्याने योजना आखली आहे. त्यामुळे आपले जैविक मुलं त्याआधारे एकमेकांना ओळखू शकतील, अशी त्याची योजना आहे.

पॉवेलच्या मते हे मोठे जोखमीचे काम आहे. पण शुक्राणू दाता असण्याचा आपल्याला अभिमान असल्याचे ते म्हणाले. त्याचा मला कोणताही पश्चाताप नाही. सध्या जगभरात निरोगी आणि सक्षम शुक्राणू ही गरज आहे, त्यांची कमतरता, उणीव जगाला भासत आहे. त्यामुळे मी या कामात काही योगदान देऊ शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे तो म्हणाला.

Non Stop LIVE Update
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.