WhatsApp चं तर मोठं कांड; युझर्स तर शोधून शोधून हैराण, ती निळी रिंग कुणी पळवली

WhatsApp AI : व्हॉट्सॲपवरील निळे वर्तुळ अचानक गायब झाले आहे. अनेक युझर्सला ते सापडत नसल्याचे समोर आले आहे. कंपनीने हे फीचर हटवल्याचे समोर येत आहे. सध्या व्हॉट्सॲपवर मेटा एआयची ही ब्लू रिंग दिसणार नाही.

WhatsApp चं तर मोठं कांड; युझर्स तर शोधून शोधून हैराण, ती निळी रिंग कुणी पळवली
निळी रिंग कोणी हरवली
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 5:32 PM

व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने Meta AI ची ब्लू रिंग हटवली आहे. गेल्या काही दिवसांपासून युझर्सला त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक ब्लू रिंग दिसत होती. हे निळे वर्तुळ आता व्हॉट्सॲप वर दिसत नसल्याने वापरकर्ते पण बुचकाळ्यात पडले आहेत. सध्या ही निळी रंग व्हॉट्सॲपवरुन हटवण्यात आली आहे. अँड्राईड, iOS आणि विंडोज व्हॉट्सॲपवरुन मेटाने हा निळा गोळा हटवला आहे. त्याधारे युझर्स एआय चॅटबॉटचा वापर करत होते.

अनेक युझर्सची तक्रार

सध्या काही युझर्सच्या फोनवर आणि विंडोज ॲपवर Meta AI ची निळी रिंग दिसत आहे. ती व्यवस्थित काम पण करत आहे. पण काही युझर्सचे स्मार्टफोन आणि विंडोज ॲपवरुन हा निळा गोळा पूर्णपणे गायब झाला आहे. . मेटा एआई मेटाचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड (AI) चॅटबॉट आहे. निळी रिंग या चॅटबॉटचे शॉर्टकट आहे. या रिंगवर टॅप अथवा क्लिक केल्यावर मेटा एआयचा वापर करता येतो.

हे सुद्धा वाचा

Meta AI : चॅटजीपीटी आणि जेमिनी एआई सोबत फाईट

यावर्षी मेटाने मायक्रोसॉफ्ट ओपन एआयच्या चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमिनी एआयला टफ फाईट देण्यासाठी मेटा एआय लाँच केले होते. या फीचरच्या मदतीने युझर्सच्या प्रश्नांना उत्तर मिळते. एआय चॅटबॉट बाजारात वेगाने वाढले. मेटा पण या नवीन तंत्रज्ञानात मागे राहू इच्छित नव्हती. त्यामुळे मेटा एआय भारतासह संपूर्ण जगात लाँच करण्यात आले होते.

सध्या मेटा एआयची निळी रिंग काही स्मार्टफोनमधून गायब होण्यामागे एक बग असल्याचे काही युझर्स गृहित धरत आहेत. कारण हे फीचर काही स्मार्ट मोबाईलमध्ये सुरु आहे. तर काही स्मार्टफोनमध्ये दिसत नसल्याचे समोर आले आहे. याविषयी मेटा अथवा व्हॉट्सॲपकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

कसा होतो Meta AI चा वापर?

मेटा एआयचा वापर करण्यासाठी व्हॉट्सॲपच्या वरील भागात निळी रिंग दिसते. त्यावर क्लिक केल्यावर मेटाचे एआय चॅटबॉट उघडते. या ठिकाणी युझर त्याच्या मनातील प्रश्न विचारु शकतो. कोणताही विषय, एखादा लेख, कविता, कथा हे लिहिण्यासाठी सांगू शकतो. याशिवाय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युझर एक छायाचित्र पण तयार करु शकतो.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.