Video | लग्नविधी सुरु, नवरी-नवरदेव खूश, मध्येच नातेवाईकांनी भलताच खेळ मांडला, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडीयावर सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्न समारंभात नवरी-नवरदेवाकडील मंडळी एकमेकांना भिडले आहेत.

Video | लग्नविधी सुरु, नवरी-नवरदेव खूश, मध्येच नातेवाईकांनी भलताच खेळ मांडला, व्हिडीओ व्हायरल
marriage

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक मजेदार व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओंपैकी लग्न समारंभातील व्हिडीओंवर विशेष रुपाने चर्चा केली जाते. लग्न समारंभातील धम्माल नेटकऱ्यांना आवडते. कदाचित याच कारणामुळे सोशल मीडीयावर सध्या एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्न समारंभात नवरी-नवरदेवाकडील मंडळी एकमेकांना भिडले आहेत. (people falling on bride and groom in marriage ceremony video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा चांगलाच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु आहे. लग्नविधीदरम्यान नवरी आणि नवरदेवाकडील लोकांमध्ये चांगलंच युद्ध रंगलंय. या व्हिडीओमध्ये एका टॉवलेला घेऊ दोन्ही बाजूचे पाहूणे ओढाताण करत आहेत.

टॉवेल खेचाखेचीचा प्रकार पाहून नवरीला हसू आवरले नाही

व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु आहे. लग्नविधीसाठी नवरी आणि नवरदेव खाली बसल्याचे आपल्याला दिसत आहे. मात्र यावेळी एका टॉवेलमुळे नवरी तसेच नवरदेवाकडील मंडळींमंध्ये चांगलाच वाद रंगला आहे. दोन्ही बाजूचे मंडळी टॉवेलला जोरजोरात खेचत आहेत. हा सर्व प्रकार नवरी तसेच नवरदेव पाहत आहेत. टॉवेल खेचाखेचीचा हा प्रकार पाहून नवरीला हसू आवरलेले नाही. शेवटी दोन्ही बाजूच्या लोकांमधील ही खेचाखेची चांगलीच रंगली आहे. यामध्ये काही लोक नवरी आणि नवरदेवाच्या अंगावर पडल्याचेसुद्धा दिसत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. लोकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

Video | मोदींच्या आवाजात नीरज चोप्राला शुभेच्छा, श्याम रंगीलाचा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोनेरी नीरजचं मोदींबद्दलचं ‘ते’ ट्विट 2 वर्षानंतर लोकांच्या हाती लागलंच, ज्यात तो म्हणाला होता……

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

(people falling on bride and groom in marriage ceremony video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI