AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेले, मुलाच्या वयाच्या तरुणासाठी ‘ती’ झाली वेडीपिशी

प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी व्हिडीओ केल्या नंतर ती दोघं चर्चेत आली आहे. या व्हिडीओमधील राहेल जी शिक्षिका आहे आणि ती वय 48 वर्षांची आहे. तर तिचा बॉयफ्रेंड ॲलेक्स हा 25 वर्षांचा आहे.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेले, मुलाच्या वयाच्या तरुणासाठी 'ती' झाली वेडीपिशी
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 23, 2022 | 6:12 PM
Share

वॉशिंग्टनः सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. अमेरिकेत (America) राहणारे एक जोडपे त्यांच्या वयाच्या अंतरामुळे चर्चेत आले आहे. त्यांनी केलेल्या एका व्हिडीओमध्ये रिलेशनशिप (relationship), रोमान्स (Romance) आणि त्यांच्या भेटीगाठी बद्दल सांगितले आहे. विशेष म्हणजे ही महिला बॉयफ्रेंडपेक्षा 23 वर्षांनी मोठी आहे. ती दोघं प्रेमात आकंठ बुडालेली आहेत, आणि लोकं मात्र त्यांना आई आणि मुलगा समजत आहेत.

प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी व्हिडीओ केल्या नंतर ती दोघं चर्चेत आली आहे. या व्हिडीओमधील राहेल जी शिक्षिका आहे आणि ती वय 48 वर्षांची आहे. तर तिचा बॉयफ्रेंड ॲलेक्स हा 25 वर्षांचा आहे.

काही दिवसांपूर्वी या जोडप्याने Tiktok वर ‘How to date with a older woman’ नावाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आणि तो प्रचंड व्हायरल झाला होता. 30 लाखांहून अधिक वेळा तो पाहिला गेला.

रेशेल आणि ॲलेक्स या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र अनेक संभ्रमात पडली होती. अनेकांनी त्यांच्या या नात्याबद्दल विचारणा केल्या वर मात्र त्यांनी आपण दोघं आई आणि मुलगा नसल्याचे स्पष्ट केले.

मात्र त्यांचे हे नाते किती रोमँटिक आहे हेही त्यांनी खुलेपणाने सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या एका व्हिडीओमध्ये आपण आई आणि मुलगा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

प्रेमात असलेल्या राहेल आपल्या नात्याबद्दल कबूली देताना सांगते की, मला दोन मुले आहेत. मोठा मुलगा बेन 23 वर्षांचा आहे तर धाकटा मुलगा जॉर्ज हा 19 वर्षांचा आहे.

रेशेल आणि ॲलेक्स यांचा एक व्हिडीओ राहेलच्या मुलाने पाहिल्या नंतर तो थोडा नाराज झाला होता. मात्र त्यानंतर ती म्हणते की मी आमच्या नात्यांची सहज कबूली दिली आहे.

रेशेल सांगते की, ॲलेक्सला मी पहिल्यांदा डेटिंग ॲपवर पाहिले. त्यानंतर त्यांच्या त्यांची फ्रेंडशिप डिसेंबर 2020 मध्ये सुरू झाली. त्यावेळी तिचा तिच्या पतीपासून घटस्फोट झाला होता.

रॅशेलने ॲलेक्सला त्याचे वय विचारले तेव्हा तो खूपच लहान असल्याचे तिला समजले. तरीही त्यानंतर या जोडप्याने एकमेकांबरोबर संवाद साधून एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रेशेलने सांगितले की, जेव्हा दोघांनी पहिल्यांदा एकत्र व्हिडिओ बनवला तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांना ट्रोल केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी एकमेकांना टॅगही केले होते. या जोडप्याचे टिकटॉक अकाउंटवर 71 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?