इटलीच्या फॅशनमध्ये कोल्हापुरी चप्पल, भारताचे लोक का भडकले ?

कोल्हापुरी चप्पल सर्वांना परिचित आहे. या चप्पलेचे दर्शन एका फॅशन शोमध्ये झाल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. या चप्पलेमुळे का हंगामा झाला...वाचा

इटलीच्या फॅशनमध्ये कोल्हापुरी चप्पल, भारताचे लोक का भडकले ?
| Updated on: Jun 26, 2025 | 8:44 PM

कोल्हापुरी चप्पल केवळ चप्पल नसून भारतीय कारागिरी आणि परंपरेचे प्रतिक आहे. कोल्हापूर चप्पला त्याच्या टीकाऊपणा आणि विशिष्ट आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. सध्या कोल्हापूरी चप्पल समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे झाले काय ? इटलीच्या मिलान येथे सुरु असलेल्या फॅशन शोमध्ये मॉडेलनी कोल्हापूरी चप्पल परिधान करुन रॅम्प वॉक केला आणि यामुळे खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण पाहूयात…

इटलीत मिलानमध्ये समर फॅशन शो सुरु आहे. या शोत कोल्हापूरी चपल्ला परिधान करुन मॉडेल रॅम्प वॉक करताना दिसले. परंतू या शोमध्ये कोल्हापूरी चप्पल घालून मॉडेल्स दिसले. वास्तविक या कोल्हापूरी चप्पलचे क्रेडिट न मिळाल्याने भारतीय लोक भडकलेले आहेत. विशेष करुन कोल्हापूरी चप्पल बनवणारे कारागिर संतप्त झाले आहेत. लक्झरी साहित्य बनवणारी कंपनी Prada ने या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. या कंपनीचे साहित्य लाखो रुपयांना विकले जाते. इतर कंपन्याप्रमाणे या कंपनीने समर कलेक्शन सादर केले. या मॉडेल्सच्या शरीरावर मॉडर्न डिझायनर कपडे, बॅग आणि पायात कोल्हापूरी चप्पल होती. तिच ती आपली चमड्याची कोल्हापूरी चप्पल जी कधीच तुटत नाही फाटत नाही.

फॅशन शो जानकारांनी ही चप्पल इंडियन असल्याचे लागलीच ओळखले. त्यानंतर सोशल मीडियावर दणादण पोस्ट सुरु झाल्या. लोकांनी या कंपनीच्या नावाने शिमगा केला. एवढी मोठी नावाजलेली कंपनी आणि भारतीय चप्पलांना वापरते. परंतू तिचे क्रेडीट देत नसल्याने युजरने टीका केली. भारतीय सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अदाजानिया यांनी इव्हेंटचा फोटो शेअर करीत म्हटले की ही कोणती डिझायनर सँडल नाही. ही कोल्हापूरी चप्पल आहे.

इटलीच्या मिलान फॅशन शोमध्ये कोल्हापूरी चप्पल –

इंस्टाग्रामवर Diet Sabya नावाने एक फॅशन क्रिटीक आहेत त्यांनी लिहीलेय की चिडचिड करणाऱ्या आंटी सारखा आवाज करुन नका, परंतू आपण खरंच 1000 यूरो (सुमारे 99,866 रुपये) देऊन Prada कोल्हापुरी चप्पल घेण्यास तयार आहोत का ? केवळ यासाठी की युरोपीयन लोक घालणार म्हणून, कोल्हापूर चप्पल अचानक जागतिक फॅशन बनणार का ?विचार कराल तर तुम्हालाही इंटरेस्टींग वाटेल ?
काही युजरने म्हटले की हे लोक भारतीय संस्कृती आणि फॅशनने प्रेरित होत असतील पण ते कधीही हे मान्य करणार नाहीत की त्यांनी भारतीयांकडून प्रेरणा घेतली आहे. लोक संतापले आहेत कारण हे पहिल्यांदाच घडलेले नाही.

कोल्हापुरी चप्पलची सुरुवात कशी झाली?

कोल्हापुरी चप्पलेची सुरुवात महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातून झाली आहे. १३ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. आधी ही चप्पल मराठा योद्धा घालायचे नंतर ती ग्रामीण समुदायाकडे आली. या चपलेचे वैशिष्ट्ये असे की उष्णतेच्या वेळी पाय थंड राहातात आणि थंडीत ही टीकते. एक चप्पल तयार करण्यासाठी 2 ते 4 दिवस लागायचे. या चप्पलेचे शिवण, डिझाईनपर्यंत प्रत्येक कारागीर हाताने ही चप्पल शिवतात. त्यामुळे प्रत्येक जोड वैशिष्ट्यपूर्ण होतात. याची निर्मिती इको-फ्रेंडली प्रोसेस असते. या चपलेला जीआय टॅग मिळालेला आहे.