AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वत:चा देश सोडून धनदांडग्यांचा परदेशात ओढा, गडगंज श्रीमंतांना कोणत्या देशाची क्रेझ, हे टॉप-10 देश

Henley Private Wealth Migration Report 2025 नुसार जगभरातील हजारो लोकांनी त्यांचा देश सोडून परदेशात स्थायिक होणे पसंत केले आहे. 2025 सालात कोणते 10 देश श्रीमंतांची पहिली पसंती बनले आहेत ते जाणून घेऊया

स्वत:चा देश सोडून धनदांडग्यांचा परदेशात ओढा, गडगंज श्रीमंतांना कोणत्या देशाची क्रेझ, हे टॉप-10 देश
| Updated on: Jun 26, 2025 | 3:39 PM
Share

जर तुम्ही गडगंज श्रीमंत झाला असाल तर कोणत्या देशात राहणे पसंद कराल ? कदाचित तुम्ही अब्जाधीश होण्यासाठी अशा देशात जाल जेथे तुम्हाला चांगली संधी आहे. परदेशातील राहणीमान कोणाला नाही आवडत. तेथील डॉलरमधील कमाईसाठी भलेभले हाती पैसा आल्यानंतर परदेशात जातात. त्यामुळे व्यापारात कोणतेही कर नसलेल्या देशात आता भारतातील श्रीमंत लोकांची पावले वळत आहेत. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2025 चा अहवाल आला असून त्यानुसार आता साल 2025 मध्ये श्रीमंतांचे 10 फेव्हरेंट देश कोणते ते पाहूयात…

1. संयुक्त अरब अमीरात (UAE)

साल 2025 मध्ये श्रीमंताची पहिली पसंती UAE बनला आहे. या वर्षी 9,800 करोडपती आपला देश सोडून युएईला गेले आहेत. संयुक्त अरब अमीरात जगभरातील श्रीमंतांची पंढरी बनला आहे. कारण या देशात आयकर वसुल केला जात नाही. म्हणजे हा देश संपूर्ण आयकर मुक्त देश आहे.

2. अमेरिका

2025 मध्ये आतापर्यंत 7,500 करोडपतींनी अमेरिकेला आपले घर बनवले आहे. येथे बिझनसमनसाठी असलेल्या पायाभूत सुविधांना जगातील नवश्रीमंतांना आकर्षित केले आहे. अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था आणि शानदार आरोग्य प्रणाली देखील यासाठी कारणीभूत आहे. अमेरिका त्यांच्या व्यापाऱ्यांना कायदेशीर मदत आणि नवीन तंत्रज्ञान पुरवते. यामुळे गुंतवणूकदार किंवा व्यापारी यांच्यासाठी अमेरिका स्वर्ग आहे.

3. इटली

इटली,या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेनलेच्या अहवलानुसार साल 2025 मध्ये 3,600 करोडपतींना इटलीत डेरा टाकला आहे.सांस्कृतिक समृद्धी, नैसर्गिक सौदर्य आणि टॅक्स धोरण याचा हा परिपाक आहे. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी इटलीत व्यापारी जात आहेत.

4. स्विर्त्झलँड

या हेनले रिपोर्टनुसार स्वित्झलँडने या वर्षी 3,000 करोडपतींना पायघड्या घालत त्यांचे स्वागत केले आहे. येथील मजबूत चलन, कमी गुन्हेगारी आणि उंची राहाणीमान श्रीमंतांना आकर्षित करीत आहे.

5. सौदी अरब

आखाती देशातील युएई नंतर सौदी अरबमध्ये सर्वाधिक करोडपतींनी घर घेतले आहे. हेनले रिपोर्टनुसार साल 2025 मध्ये 2,400 करोडपतींनी सौदी अरबला आपलेसे केले आहे. येथेही उत्पन्नावर कोणताही कर नाही.

6. सिंगापुर

दक्षिण पूर्व आशियातील देशात सिंगापुर जगभरातील नवउद्योजकांचे आकर्षणाचे केंद्र राहीला आहे. यावर्षी 1,600 श्रीमंत हस्तींना सिंगापुरला आपले घर बनवले आहे. सिंगापुरची भौगोलिक स्थिती यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले जाते.

7. पोर्तुगाल

यावर्षी यूरोपात इटलीनंतर पोर्तुगालला श्रीमंत लोकांनी आपले सेकंड होम बनवले आहे. समुद्री किनारी असलेला हा देश व्यापारासाठी महत्वाचे बंदर आहे. येथून यूरोप, अमेरिका आणि भूमध्य सागराच्या मार्गे आशियातील बाजारपेटांपर्यंत जाता येत असल्याने बिझनसमनसाठी येथे शिफ्ट होणे फायद्याचा सौदा आहे.

8. ग्रीस

साल 2025 च्या 6 महिन्यात ग्रीसने 1,200 करोडपतींचे आपल्या देशात स्वागत केले आहे. भूमध्य सागरात असल्याने यूरोपियन यूनियन (EU)पर्यंत जाता येत असल्याने आर्थिक आकर्षण आणि शानदार जीवनशैली देखील येथे स्थायिक होण्याचे मोठे कारण आहे.

9. कॅनडा

हेनलेच्या रिपोर्ट अनुसार साल 2025 मध्ये 1,000 हून अधिक श्रीमंत लोकांनी कॅनडात स्थलांतर केले आहे.

10. ऑस्ट्रेलिया

साल 2025 मध्ये 1,000 हजारांहून अधिक करोडपतींनी ऑस्ट्रेलियात आपले घर बनवले आहे. येथील मजबूत अर्थव्यवस्था आणि आल्हाददायक वातावरण,जागतिक दर्जाच्या सुविधा कारणीभूत आहे. सिडनी आणि मेलबर्नसारखी शहरं श्रीमंतांना अधिक संधी आणि आकर्षक जीवनशैली देत आहेत.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.