भारताशी दुश्मनी करुन तुर्कीने स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड, एका महिन्यात औकात कळली
"ऑपरेशन सिंदूर" दरम्यान तुर्कीने भारताविरुद्ध केलेली विधाने आणि पाकिस्तानला दिलेला पाठिंबा आता त्यांच्या अंगलट आला आहे. तुर्की पाकच्या बाजूने उभा राहिल्याने भारतीयांच्या भावना चांगल्याच दुखावल्या होत्या...

तुर्कीने भारत आणि पाक तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला मदत केली होती. तुर्कीने पाकिस्तानला अत्याधुनिक ड्रोन पुरवल्याने पाकिस्तानने आपल्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आता भारताशी पंगा घेतल्याने तुर्कीची वाट लागली आहे.भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्याने आणि सोशल मीडियावर बहिष्कार पुकारल्याने तुर्कीच्या टुरिझम इंडस्ट्रीची वाट लागली आहे. अहवालानुसार मे २०२५ मध्ये तुर्कीला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या २४ टक्के घसरली आहे. केवळ एका महिन्यातच तुर्कीची वाट लागली आहे.
वास्तविक, “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान तुर्कीने भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत भारतीयांना दु:खी केले होते. यानंतर भारतीयांनी सोशल मीडियावर #BoycottTurkey ट्रेंड चालवला होता. ज्याचा थेट परिणाम तुर्कीच्या टुरिझमवर झाला होता.
भारताचा मोठा झटका
भारतातून दरवर्षी लाखो पर्यटक तुर्कीला पर्यटनासाठी जातात. इस्तंबुल, कप्पाडोकिया आणि एंटाल्या सारख्या डेस्टीनेशन भारतीयांत खूपच लोकप्रिय आहे. परंतू जेव्हापासून तुर्कीने भारताच्या विरोधात राजकीय भूमिका घेतली, भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सी आणि टुर ऑपरेटर्सने तुर्की टुर पॅकेडच्या विक्रीत घट करायला सुरुवात केली.
बायकॉटचा परिमाण दिसू लागला
मीडियातील बातम्यानुसार मे २०२५ मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या २४ टक्के घसरण झाली आहे. जी कोणा एका देशाकडून येणाऱ्या पर्यटकांच्या प्रकरणात तुर्कीसाठी मोठा धोका म्हटला जात आहे. तर अन्य प्रमुख देशांकडून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्या एकतर स्थिर राहीली किंवा थोडी वाढली आहे. परंतू भारतातील पर्यटकांची संख्या घसरल्याने हा भारत आणि पाकिस्तान तणावानंतर सुरु केलेल्या बॉयकॉट मोहिमेचा परिणाम असल्याचे म्हटले जाते.
हे नुकसान का मोठे आहे?
भारत तुर्कीसाठी एक मोठे वाढणारे टूरिझम मार्केट होते. भारतीय पर्यटक केवळ मोठ्या संख्येने तुर्कीला जात नव्हते तर हायएंड हॉटेल्स, शॉपिंग आणि लोकल गाईड सेवांवरही मोठा खर्च करत होते. त्याचा थेट तुर्कीच्या लोकल इकोनॉमीला थेट फायदा होत होता.
आता भारतीय पर्यटकांनी तुर्कीशी फारकत घेतल्याने ,होणारे हे आर्थिक नुकसान अब्जावधी रुपयांचे असल्याचे म्हटले जात आहे. ट्रॅव्हल्स इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मते तुर्कीने त्यांच्या भारताबद्दलच्या धोरणात बदल नाही केला तर ही घसरण आणखीन सुरु राहण्याची शक्यता आहे.
नुकसान आणखी होण्याची शक्यता
भारत जगातील सर्वात मोठे ट्रॅव्हल्स मार्केटपैकी एक आहे.एकदा का येथील पर्यटकांना ओहोटी लागली तर निगेटिव्ह सिग्नल जाऊ शकतो. त्याचा परिमाण केवळ पर्यटनापर्यंत मर्यादित राहात नाही, तो बिझनस, डिप्लोमसी आणि इन्व्हेस्टमेंटपर्यंत तो पसरत जाण्याचा धोका आहे. तुर्कीने भारताशी जी दुश्मनी पत्करली आहे त्याचा थेट परिणाम त्याला आता भोगावा लागणार आहे.
