AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नेंट महिलेचा माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप पाहून पाहुणे झाले थक्क, Video व्हायरल

बेबी शॉवरमध्ये प्रेग्नेंट महिलेने केला बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रचंड सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप पाहून पाहुण देखील झाले थक्क. व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

प्रेग्नेंट महिलेचा माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स, स्टेप पाहून पाहुणे झाले थक्क, Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 07, 2026 | 4:07 PM
Share

सध्या एका गरोदर महिलेचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या आत्मविश्वासपूर्ण डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणारी डिजिटल क्रिएटर सिल्वरी शाह हिने आपल्या बेबी शॉवर समारंभात बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या सर्वात गाजलेल्या ‘हमको आज कल है इंतजार’ या गाण्यावर केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सिल्वरी शाह या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असून त्या डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत बेबी शॉवरचा कार्यक्रम आयोजित केला होता. या समारंभातील डान्सचा व्हिडिओ सुरुवातीला केवळ कुटुंबीय आणि मित्रांपुरताच मर्यादित होता. मात्र, 5 ऑगस्ट रोजी ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर तो झपाट्याने व्हायरल झाला.

आत्मविश्वासाने सादर केला डान्स

व्हिडिओमध्ये सिल्वरी शाह गुलाबी रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये दिसत असून, त्या आपल्या बेबी बंपसह अतिशय आत्मविश्वासाने स्टेजवर डान्स करताना दिसतात. गाण्याच्या प्रत्येक तालावर त्यांनी सुंदर स्टेप्स सादर केल्या असून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित कुटुंबीय आणि मित्रांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे वातावरण आणखी रंगतदार झाले.

सिल्वरी यांनी ज्यावर डान्स केला ते ‘हमको आज कल है इंतजार’ हे गाणं 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सैलाब’ चित्रपटातील आहे. हे गाणं अभिनेत्री माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आले होते. आजही हे गाणं लग्नसमारंभ, संगीत सोहळे आणि डान्स परफॉर्मन्समध्ये मोठ्या आवडीने वापरले जाते.

नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी सिल्वरी शाह यांच्या आत्मविश्वासाचे, डान्स कौशल्याचे आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी हा व्हिडिओ प्रेरणादायी असल्याचे म्हटले असून, गर्भधारणेच्या काळात आनंदाने प्रत्येक क्षण साजरा करण्याचा संदेश यातून मिळत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by SILVERY SHAH (@silvery_shah)

सध्या सोशल मीडियावर बेबी शॉवर आणि प्रेग्नन्सी सेलिब्रेशनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिले जात आहेत. अशा ट्रेंडमध्ये सिल्वरी शाह यांचा हा व्हिडिओही विशेष ठरला असून, लाखो प्रेक्षकांची मने जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?