भारतात पाण्याची बाटली फक्त २० रुपये, पण स्वित्झर्लंडमध्ये किती ? आकडा ऐकून विश्वास बसणार नाही!
भारत आणि स्वित्झर्लंडमधील पाण्याच्या किंमतीमधील फरक मुख्यतः त्यांच्या भौगोलिक परिस्थितीवर आणि उत्पादनाच्या प्रक्रियेवर आधारित आहे. भारतामध्ये नैसर्गिक जलस्रोत, जसे की नद्या, तलाव, आणि विहिरी भरपूर आहेत. त्यामुळे पाणी स्वस्त आणि सहज मिळवता येते. मात्र स्वित्झर्लंडमध्ये पाणी शुद्ध करणं, त्याची पॅकेजिंग करणे आणि वितरण यासाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे तिकडच्यापाण्याची किंमत असेल तरी किती चला जाणून घेऊया

भारतामध्ये पिण्याचं पाणी सहज उपलब्ध असून त्याची किंमत खूप स्वस्त आहे. एका लिटरच्या पाण्याची बाटली तुम्हाला साधारणतः 20 रुपयांमध्ये मिळते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हेच पाणी इतर काही देशांमध्ये किती महाग असू शकते? विशेषतः स्वित्झर्लंडमध्ये, जिथे पाणी खूप महाग आहे. त्याची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. चला, आज जाणून घेऊया पाण्याच्या किंमतीतील हा मोठा फरक.
भारत: सहज उपलब्ध आणि स्वस्त पाणी भारतामध्ये पिण्याचं पाणी सहज उपलब्ध आहे. देशभरातील गावं, शहरं, आणि अगदी मेट्रो सिटींमध्ये पाणी मिळवण्यासाठी लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो नाही. भारतात एक लिटर पाणी साधारणतः 20 रुपयांमध्ये मिळतं, तेही स्वच्छ आणि शुद्ध पाणी. भारतीयांसाठी पाणी हे एक महत्त्वाचे आणि सहज उपलब्ध साधन आहे, आणि त्याची किंमत देखील खूप स्वस्त आहे.
स्वित्झर्लंड: महाग पाणी आणि त्यामागील कारणं स्वित्झर्लंडमध्ये मात्र परिस्थिती अगदी वेगळी आहे. तिथे पाणी खूप महाग आहे आणि त्यासाठी लोकांना मोठा खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडमध्ये 330 मिलिलिटरच्या पाण्याची बाटली तुम्हाला साधारणतः 347 रुपये खर्च करून मिळेल. याचा अर्थ, एका लिटर पाण्यासाठी तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते!
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
याचे कारण आहे की स्वित्झर्लंडमध्ये नैसर्गिक पाणी स्रोत खूप कमी आहेत आणि त्याची शुद्धता राखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तिथे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया खूप महाग आहे, तसेच पाणी पॅकेजिंग आणि वितरण देखील अत्यंत खर्चिक आहे. कामगारांचे उच्च पगार आणि उच्च उत्पादन खर्चामुळे पाण्याची किंमत वाढते. यामुळे ते पाणी महाग पडते आणि नागरिकांना यासाठी मोठा खर्च करावा लागतो.
