AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावातली लोकं विमानानं नाश्ता करायला जातात, प्रत्येकाकडे स्वतःचं विमान!

या गावात एकूण 1300 घरे असून त्यात सुमारे 5 हजार लोक राहतात. यातील निम्म्याहून अधिक घरमालकांकडे म्हणजे 700 कुटुंबांकडे स्वत:ची विमाने आहेत.

या गावातली लोकं विमानानं नाश्ता करायला जातात, प्रत्येकाकडे स्वतःचं विमान!
Private airplane villageImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 04, 2023 | 12:26 PM
Share

आपण सर्व जण सध्या एकविसाव्या शतकात जगत आहोत. असं असूनही जेव्हा जेव्हा विमान आपल्या डोक्यावरून जातं, तेव्हा आपण सगळेच अनेकदा आश्चर्याने ते पाहण्यासाठी घराबाहेर पडतो. काहीही झालं तरी विमानात बसून ते बारकाईने पाहणं हे सध्या लाखो लोकांचं मोठं स्वप्न आहे. जगात असे एक गाव आहे जिथे बहुतेक लोकांचे स्वत:चे खाजगी विमान आहे आणि ते त्यात बसून नाश्ता करायला जातात, असे जर कोणी म्हटले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हो ना?

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील हे गाव स्प्रूस खाडी आहे. या गावाला निवासी एअरपार्क असेही म्हणतात. या गावात एकूण 1300 घरे असून त्यात सुमारे 5 हजार लोक राहतात. यातील निम्म्याहून अधिक घरमालकांकडे म्हणजे 700 कुटुंबांकडे स्वत:ची विमाने आहेत. यासाठी लोकांनी गॅरेजऐवजी मोठे हँगर तयार केले आहेत, ज्यात विमान सुरक्षित ठेवण्यात येतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावात राहणारे बहुतेक लोक ट्रेंड प्रोफेशनल्स पायलट आहेत. अशा वेळी विमान ठेवणे आणि उडविणे त्यांच्यासाठी सामान्य आहे. गावात अनेक नामवंत वकील, डॉक्टर, इंजिनिअरही राहतात, त्यांनाही विमानं ठेवण्याची आवड आहे. विमान उडविण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे.

ही विमाने उडविण्यासाठी व उतरविण्यासाठी गावाबाहेर धावपट्टी आहे. लोक आपल्या हँगरमधून विमान काढून गाडीप्रमाणे चालवताना धावपट्टीवर घेऊन जातात आणि मग तेथून उड्डाण करून आपल्या डेस्टीनेशनवर पोहोचतात.

गंमत म्हणजे या गावातील बहुतेक लोक दर शनिवारी आपल्या विमानाने धावपट्टीवर जमतात आणि मग तिथून विमान उडवतात आणि एका मोठ्या विमानतळावर जाऊन नाश्ता करतात. या सहलीला सॅटरडे मॉर्निंग गॅगल म्हणतात. नाश्ता करून ते विमान उडवतात आणि आपापल्या घरी परततात. हा त्यांचा छंद आहे, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होतो.

फक्त अमेरिकेतील या गावात लोक आपली खाजगी विमाने मोठ्या प्रमाणात ठेवतात असे नाही. टेक्सास, वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, ॲरिझोना आणि कोलोराडोसह अमेरिकेतील अनेक राज्ये आहेत जिथे अशी मनोरंजक दृश्ये पहायला मिळतील.

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत असे सुमारे 600 समुदाय आहेत, जिथे लोकांची स्वतःची विमाने मोठ्या संख्येने आहेत. याचे कारण अमेरिकेचे दरडोई उत्पन्न जास्त आहे, ज्यामुळे तिथले लोक इतके श्रीमंत आहेत की त्यांच्यासाठी विमान विकत घेणेही मोठी गोष्ट नाही.

Follow Us
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा