Video : नवरदेवाचा हार घालण्यास नकार म्हणाला, “मै झुकुंगा नहीं साला!”, व्हीडिओ व्हायरल…

| Updated on: Apr 11, 2022 | 4:16 PM

लग्नाच्या मंडपात नवरदेवाने पुष्पा सिनेमातील डायलॉग म्हटला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांना हार घालताना दिसत आहे. इतक्यात अचानक नवरदेव हार घालण्यास नकार देतो आणि पुष्पा सिनेमामधील मै झुकुंगा नहीं साला हा डायलॉग म्हणतो.

Video : नवरदेवाचा हार घालण्यास नकार म्हणाला, मै झुकुंगा नहीं साला!,  व्हीडिओ व्हायरल...
व्हायरल व्हीडिओ
Follow us on

मुंबई : ‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise) हा सिनेमा येऊन बरेच दिवस झाले. पण या सिनेमातील डायलॉग आजही अनेकांच्या बोलण्यात येतात.दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. बॉक्स ऑफिससह सोशल मीडियावर या सिनेमाची चलती होती. यातले डायलॉग या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग होती. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने असा धमाका केला आहे, की तो आता लोकांच्या मनातून सहजासहजी बाहेर पडत नाही. चित्रपटच नाही तर यातील गाणीही सुपरहीट झाली. त्याचे डायलॉग सुपरहीट झाले. त्यातीलच मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका नवरदेवाचा व्हीडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होतोय. यात गळ्यात हार घालताना मै झुकुंगा नहीं साला म्हणाला आणि त्याचा व्हीडिओ व्हायरल झाला.

लग्नमंडपात पुष्पाचा डायलॉग

लग्नाच्या मंडपात नवरदेवाने पुष्पा सिनेमातील डायलॉग म्हटला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये नवरी आणि नवरदेव एकमेकांना हार घालताना दिसत आहे. इतक्यात अचानक नवरदेव हार घालण्यास नकार देतो आणि पुष्पा सिनेमामधील मै झुकुंगा नहीं साला हा डायलॉग म्हणतो. त्यावरची सिग्नेचर स्टेप करतो. हा व्हीडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. हा व्हिडिओ nehu22sa या इन्स्टा अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला मिलियनमध्ये ह्यूज आहेत. त्याला एक मिलियनहून अधिकांनी लाईक केलंय.

चिमुकल्यांमध्ये पुष्पाची क्रेझ

पुष्पा सिनेमातील मै झुकेगा नहीं साला हा डायलॉग अनेकांच्या ओठावर आहे. हाच डायलॉग आणि त्याची स्टाईल करतानाचा एका चिमुकल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. या लहान मुलाचा हा क्यूट व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीला उतरतोय. हितेश नायक या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आलाय. या व्हीडिओला 35 लाखांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करून हा व्हीडिओ आवडल्याचं सांगितलं आहे.क्यूट पुष्पा असं एकाने म्हटलंय. तर दुसरा म्हणतो, झुकना मत… तर तिसऱ्याने तू झुकणार नसशील तर मीही झुकणार नाही, असं म्हटलंय.

संबंधित बातम्या

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Social Media Trending : दारूच्या नशेत दोन तरूणांनी बांधली लग्नगाठ, 10 हजारांची नुकसान भरपाई घेत काहीच दिवसात घटस्फोट!

Kranti Redkar Reel : क्रांती रेडकर आणि कानातल्या झुमक्यांची दुश्मनी, पाहा भन्नाट व्हीडिओ…