AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहा रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेली ‘जनगणमन’ राष्ट्रगीताची प्रत, नोबेल पॅनलने केली शेअर

रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळणारे ते पहिले गैर-यूरोपीय आणि पहीले कवी साहित्यिक होते. 

पाहा रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेली 'जनगणमन' राष्ट्रगीताची प्रत, नोबेल पॅनलने केली शेअर
Rabindranath TagorImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Aug 15, 2024 | 8:54 PM
Share

भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. देशभरात हा क्षण साजरा केला जात आहे.या दरम्यान ‘जनमगणमन’ राष्ट्रगीत ज्यांनी रचले ते थोर साहित्यिक नोबेल पुरस्कार विजेते कवी आणि कलाकार रवींद्रनाथ टागोर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नोबेल पुरस्कार पॅनल रवींद्रनाथ टागोर यांनी हाताने लिहिलेल्या जनगणमन या राष्ट्रगीताची लिखित प्रत आज समाजमाध्यमावर शेअर केली आहे. नोबेल पॅनलने या इंग्रजी लिपीचा एक्सवर अनुवाद देखील शेअर केला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील हे सुवर्ण क्षण समाजमाध्यमात व्हायरल झाले आहेत.

शब्दांवर प्रभुत्व असलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्य प्रतिभेला टक्कर देणारा कोणीच नाही हे गीत त्याचे उदाहरण आहे. डिसेंबर 1911 रोजी मूळ बंगाली भाषेत त्यांनी ‘भरोतो भाग्यो बिधाता’ या शब्दात त्यांनी या काव्याचा पहिला छंद लिहिला आहेत. जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधानाने राष्ट्रगीत म्हणून या कवितेची निवड केली आहे. ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी ते मूळ बंगाली भाषेत लिहीले होते. या गीताला 1913 मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. आज स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त हे गीत शेअर करण्यात आले होते.

काय आहे इतिहास

‘भरोतो भाग्यो बिधाता’या कविता सदृश्य गीताला इंग्रजी अनुवाद ‘द मॉर्निंग सॉन्ग ऑफ इंडिया’ असे रवीन्द्रनाथ टागोर यांनी हस्त लिखितात लिहीलेले या पोस्टमध्ये दिसत आहे. ‘जन गण मन’ चे भाषांतर ‘आपण सर्व लोकांच्या मनाचे शासक’ आहात, अशा रूपात केलेले दिसत आहे.

येथे पाहा ट्वीटरची पोस्ट –

सकाळी 11.42 वाजात नोबेल पुरस्कारच्या  (आधी ट्वीटरवर ) ‘एक्स’ अकाऊंटवर ही पोस्ट झाल्यानंतर या पोस्टला सुमारे 1 लाख 66 हजार लोकांनी पाहीले आहे, बातमी लिहीपर्यंत या पोस्टला 1200 वेळा रीट्वीट केले गेले आहे. सुमारे 5000 यूजर्सनी या लाईक केले आहे.

रवीन्द्रनाथ टागोर एक कवी, गीतकार, लेखक, चित्रकार, नाटककार, संगीतकार आणि थोर समाज सुधारक होते. ज्यांनी बंगाली साहित्य आणि संगीतला जगभर नेले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.