अबब…जगातील सर्वात महागडा कीटक, किंमत इतकी की तुम्ही तो विकून ऑडी कार घेऊ शकता

आपल्या अनोख्या मोठ्या तोंडाच्या जबड्यामुळे ते ओळखले जातात. या किटकातील नर मादी पेक्षा लांबी थोडे मोठे असतात. ते जंगलातील इकोसिस्टीममध्ये महत्वाची भूमिका निभावतात.

अबब...जगातील सर्वात महागडा कीटक, किंमत इतकी की तुम्ही तो विकून ऑडी कार घेऊ शकता
Stag beetle InsectImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 6:33 PM

या छोट्या किटकाला पाहून तो तुम्हाला अगदीच क्षुल्लक प्राणी वाटू शकतो. तुम्ही अनेक प्रकारचे दुर्मिळ कीटक पाहीले देखील असतील. परंतू या कीटकाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल, विचित्र दिसणाऱ्या या कीटकाची किंमत तब्बल 75 लाख रुपये आहे. हा आतापर्यंत सर्वात महागडा कीटक मानला जात आहे. चला तर पाहूयात जगातील सर्वात महागड्या कीटकाची माहिती तो इतका महाग का आहे. त्याचा उपयोग काय आहे.?

हा कीटक स्टॅग बीटल नावाने ओळखला जातो. या किटकाला अनेक जण आपल्या संग्रही ठेवतात. कारण एका किटकाला 75 लाख रुपये अशी किंमत मिळते.  या किटकाला इतकी किंमत का आहे.? कारण माणसाला तो श्रीमंत करु शकतो. काही जण या किटकाला ‘गुड लक सिम्बॉल’ म्हणून घरात बाळगतात. तर काही जणांची हा कीटक आल्यानंतर आपण श्रीमंत बनतो अशी धारणा देखील आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या किटकाला मोठी किंमत मिळते.जर्नल सायंटिफिक डेटा यात आलेल्या एका लेखानूसार हे कीटक जंगलाच्या इको सिस्टीममध्ये एक महत्वपूर्ण सॅप्रॉक्सिलिक गट बनवितात. आणि आपल्या अनोख्या मोठ्या तोंडाच्या  जबड्यामुळे ते ओळखले जातात. या किटकातील नर विविध रुपात आढळतात. ते जंगलातील इकोसिस्टीममध्ये महत्वाची भूमिका निभावतात.

सांस्कृतिक महत्व 

हा कीटक त्याच्या वेगळ्या दिसण्यामुळे अनेक कीटक संग्राहकांचा आवडता कीटक आहे. स्टॅग बीटल हा सहजासहजी न सापडणारा दुर्मिळ कीटक आहे. तो जगातील अनेक भागात दुर्मिळ आहे. या किटकाला सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्व आहे. विशेषत: जपानमध्ये हा कीटक शक्ती आणि साहसाचे प्रतिक मानला जातो. त्याचा जपानच्या कला आणि साहित्यात देखील समावेश आहे.

‘हरीण बीटल’ कीटक महाग का ?

संग्राहकांकडून मागणी : अनेक दुर्मिळ किटकांचा संग्रह करणाऱ्यांना या किटकाला आपल्या संग्रहात ठेवण्यासाठी सुरुवात केल्याने त्याच्या मागणीत वाढ होत गेली. हा कीटक दुर्मिळ असल्याने त्याची किंमत वाढत गेली.त्यामुळे विविध किटकांचे संग्रह करणाऱ्यांनी त्या किटकासाठी हवी ती किंमत मोजण्याची तयारी दाखविली.

ब्रीडींग आणि व्यापार : या किटकांची मागणी वाढल्याने काही जणांनी त्याचे ब्रीडींग आणि व्यापार करायला सुरुवात केली. त्यांनी या किटकाच्या विक्रीसाठी बाजारपेठ तयार केली. त्यामुळे देखील त्याची किंमत वाढत गेली. लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या मते या 2 ते 6 ग्रॅम वजनाच्या किटकाचा सरासरी आयुर्मान 3 ते 7 वर्षे इतके असते. नर कीटक 35 ते 75 एमएम लांबीचा असतो. तर मादीची लांबी 30 ते 50 एमएम इतकी असते. स्टॅग बीटलचा वापर औषधांची निर्मिती करण्यासाठी देखील होतो.

स्टॅग बीटलचा उपयोग

तावीज देखील या किटकाचे शरीर वापरले जाते. जीवंत किटकांचा वापर मलेरिया संसर्गाच्या पॅरोक्सिस्मल टप्प्यात सुधारणा करण्यासाठी वापरले जाते. स्टॅगबीटलचे डोके तावीज म्हणून शरीरावर बांधल्याने वेदना,डोकेदुखी,हातापायात पेटके येणे, लहान मुलांनी अंथरुण ओले करणे, सूज, संधिवात आणि बाळंतपण या स्थितीत संरक्षण मिळते अशी धारणा आहे.लिसोट्स लॅटिडन्स, ज्याला सामान्यतः वायलांगटा स्टॅग बीटल किंवा ब्रॉड-टूथ स्टॅग बीटल म्हणून ओळखले जाते.ही स्टॅग बीटलची एक प्रजाती आहे. पूर्व तस्मानियामधील वायलांगटा जंगलाच्या मध्यभागी ती आढळते.हा ऑस्ट्रेलियातील दुर्मिळ किटकांपैकी एक मानला जातो.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.