हर्षल पटेलच्या हॅट्रीकने मुंबई इंडियन्सचा खेळ बिघडला, RCB जिंकल्यानंतर फॅन्सकडून मुंबईची खिल्ली, इंटरनेटवर मजेशीर Memes व्हायरल

या विजयासह #RCBvsMI सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि मिमर्स RCB चाहत्यांबद्दल अनेक तगडे मिम्स बनवत आहे!

हर्षल पटेलच्या हॅट्रीकने मुंबई इंडियन्सचा खेळ बिघडला, RCB जिंकल्यानंतर फॅन्सकडून मुंबईची खिल्ली, इंटरनेटवर मजेशीर Memes व्हायरल
#RCBvsMI सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 11:29 AM

आयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी पराभव केला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने सहा गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई 18.1 षटकांत 111 धावा केल्या आणि सामना गमावला. ( royal challengers bangalore beat mumbai indians by 54 runs fans share memes ipl 2021 )

आरसीबीकडून या विजयाचे अनेक नायक असले तरी हर्षल पटेल, युझवेंद्र चहल आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी आपल्या कामगिरीने मुंबई इंडियन्सला पाणी पाजलं. या विजयासह #RCBvsMI सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि मिमर्स RCB चाहत्यांबद्दल अनेक तगडे मिम्स बनवत आहे!

पाहा भन्नाट मिम्स:

दरम्यान, RCB ने या हंगामात आपला सहावा विजय नोंदवला आहे आणि आयपीएलच्या गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान बळकट करुन आहेत, या पराभवामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे.

हेही पाहा:

Viral Video : वृद्ध दाम्पत्यामधील क्युट प्रसंग इंटरनेटवर व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘याला म्हणतात खरं प्रेम’

Viral Video : बेबी पांडाचा क्युट व्हिडीओ व्हायरल, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरही हसू फुलेल