AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saami Saami | Video | आजीबाई जोमात, आजीबाईंचे ठुमके पाहून रश्मिका आणि समांथाही कोमात! दादी नव्हे, ‘मौज कर दी!’

Pushpa The Rise : 'सामी सामी' (Saami Saami) या गाण्यावर चक्क एका गावरान आजींनी ठुमके लगावले आहेत. याचा व्हिडीओ इन्स्ट्राग्रावरुन (Instagram Video) शेअर करण्यात आला असून इन्स्ट्राग्राम युजर्स आजीबाईंच्या ठुमक्यांवर फिदा झाले आहेत.

Saami Saami | Video | आजीबाई जोमात, आजीबाईंचे ठुमके पाहून रश्मिका आणि समांथाही कोमात! दादी नव्हे, 'मौज कर दी!'
बिनधास्त मुलीच्या आजीचा सामी सामीवर डान्स
| Edited By: | Updated on: Jan 14, 2022 | 3:39 PM
Share

ट्रेनमध्ये, एसटीत, रिक्षात, टमटमध्ये, वडापमध्ये जिथं तिथं, यत्र सर्वत्र पुष्पाची (Pushpa The Rise) गाणी धुमाकळू घालत आहेत. अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राईज सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. बरं जे या सिनेमाचे चाहतेही नाहीत, त्यांच्यातही या सिनेमाच्या गाण्यांची क्रेझ चांगलीच पाहायला मिळतेय. इन्टाग्रामवर रील्सचा धुमाकूळ सुरु आहे. नुकतंच स्रीवल्ली गाण्याचं मराठी वर्जन तयार केलेल्या अमरावतीतल्या मुलाचं गाणं युट्युबवर गाजलं होतं. तर आता ‘सामी सामी’ (Saami Saami) या गाण्यावर चक्क एका गावरान आजींनी ठुमके लगावले आहेत. याचा व्हिडीओ इन्स्ट्राग्रावरुन (Instagram Video) शेअर करण्यात आला असून अवघ्या काही तासांतच इन्स्ट्राग्राम युजर्स आजीबाईंच्या ठुमक्यांवर फिदा झाले आहेत. डिसेंबर महिन्यात अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज सिनेमा रिलीज झाला होता. त्याआधीपासून या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सामी सामी हे गाणं वारपलं गेलं होतं. दरम्यान, आता पुष्पा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास महिनाही उलटून गेला आहे. पण अजूनही या सिनेमाच्या सामी सामी गाण्याची क्रेख जराही कमी झालेली नाही.

कुणी शेअर केला व्हिडीओ?

बिनधास्त मुलगी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आजीबाईंचा व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडलाय.

पाहा व्हिडीओ –

कोण आहे बिनधास्त मुलगी?

बिनधास्त मुलगी नेमकी आहे कोण, असाही प्रश्न अनेकांना पडलेला असू शकतो. तर या बिनधास्त मुलीचं नाव आहे गौरी पवार. गौरी फक्त इन्स्ट्राग्रामच नाही तर युट्युबवरही चॅनेल चालवते. टॉम बॉय असणाऱ्या या मुलीनं बिनधास्त जगावं, आणि मनाला वाटेल ते करावं, अशा संकल्पनेतून गौरी पवारनं आपल्या चॅनेलला बिनधास्त मुलगी असं नाव दिलंय. गौरी मूळची मुंबईची असून ती गावी गेली, की आजीसोबत व्हिडीओ बनवत असते. गौरीप्रमाणेतच तिच्या आजीलाही व्हिडीओ बनवायला फार मजा येते, असं या एकूणच व्हिडीओवरुन पाहायला मिळतंय. गौरी टेक्सटाईल डिझाईनर असून ती एकदा किएटीव्ह कलाकार म्हणून सोशल मीडियात ओळखली जाते.

आजीबाईंसोबतचा हाही व्हिडीओ बघितला की नाही?

संबंधित व्हिडीओ –

Video | #srivalli | मटकीला मोड नाय, Pushpa मधील स्रीवल्लीच्या मराठी वर्जनला तोड नाय! अमरातवीच्या पोरांची कमाल

नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव

Video | ‘पुष्पाsss… पुष्पा राज! मै झुकेगा नहीं’ म्हणत तयार केलेले Reels पोट दुखेपर्यंत हसवतील!

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.