देव तारी त्याला कोण मारी, दरड दुर्घटनेत दुचाकीस्वार बचावले, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Sep 08, 2021 | 1:30 PM

उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे अनेक हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाले, जे पाहिल्यानंतर कोणाचंही हृदय हेलावून जाईल.

देव तारी त्याला कोण मारी, दरड दुर्घटनेत दुचाकीस्वार बचावले, घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय...
Follow us on

नवी दिल्ली : उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे अनेक हृदयद्रावक घटना घडल्या आहेत. या घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाले, जे पाहिल्यानंतर कोणाचंही हृदय हेलावून जाईल. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ऋषिकेश-चंबा महामार्गावर दरड कोसळताना दोन स्कूटीस्वार तरुण थोडक्यात बचावले. जेव्हा डोंगरावरून दरड पडत होती, तेव्हा दोन्ही तरुण त्या रस्त्याने स्कूटीवर निघत होते. पण आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी….. ही म्हण अनेक प्रसंगात आठवते… एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून स्कुटीवर प्रवास करणारे दोन तरुण अगदी थोडक्यात बचावले.

तरुण थोडक्यात बचावले

जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा ते पाहून तिथे उपस्थित लोकांनी प्रचंड आवाज केला. सुदैवाने, दोन्ही बाईकस्वार दुर्घटनेतून सुखरूप बचावले. ही घटना कोणीतरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या क्लिपमध्ये डोंगरावरून दरड पडत असल्याचं दिसून येत आहे. रस्ता पूर्णपणे रिकामा आहे. याच रस्त्यावरुन दोन स्कूटीस्वार येताना दिसत आहेत. पण तेवढ्यात त्यांच्या दिशेने एक मोठा खडक येतो. खडकाचा मोठा भाग अंगावर पडण्यापासून ते थोडक्यात बचावतात.

नेटकऱ्यांच्या शेकडो कमेंट

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनीही कमेंट नोंदवण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने म्हटलं की, याला ‘मरणाच्या दारातून परत देणं’ असं म्हणतात, जेव्हा एखादा खडक वरुन खाली पडत असेल, तेव्हा पुढच्या क्षणी नेमके काय होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. अशावेळी तरुण वाचले, हे त्यांचं नशीब आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या आहेत. जर अशा डोंगरदऱ्यातील रस्त्यांनी तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रत्येक क्षणी सावध रहावं लागतं, बेसाधव असून चालत नाही, अशा प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी नोंदवल्या आहेत.

(Scooter Riders Narrowly escaped After Falling on road Video Goes Viral on social Media)

हे ही वाचा :

PHOTO : रस्त्यावर पांढरे पट्टे का ओढतात, पांढऱ्या रेषांचा अर्थ नेमका काय?

Video | ‘बचपन का प्यार’नंतर आता ‘बेला चाओ’ची धूम, सहदेवच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

VIDEO : हत्तीची चिखलात धमाल मस्ती, मन जिंकतील ‘ही’ मनमोहक दृश्य