VIDEO : हत्तीची चिखलात धमाल मस्ती, मन जिंकतील ‘ही’ मनमोहक दृश्य

इंटरनेट म्हटलं की त्यावर दररोज काहीतरी नवीन व्हायरल होत असतं. त्यात आनंद देणारे, मजेशीर व्हिडीओ तर खूपच व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एक हत्ती चिखलात धमाल मस्ती करतो आहे.

VIDEO : हत्तीची चिखलात धमाल मस्ती, मन जिंकतील 'ही' मनमोहक दृश्य
हत्तीची चिखलात मस्ती

मुंबई : हत्ती पृथ्वीवरील एक सर्वात प्रेमळ आणि मजा मस्ती करणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. महाकाय असा हा प्राणी अगदी वाघालाही मात देऊ शकतो पण शाकाहारी असल्याने तसा त्याचा स्वभाव शांतच. अनेकदा इंटरनेटवर लहान हत्तींचे पाण्यात, चिखलात मजा मस्ती करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामधील हत्ती हा 9 वर्षांचा असला तरी चिखल पाहून तो अगदी लहान झाल्यासारखा वागत आहे.

केवळ 45 सेकंदाची ही व्हिडीओ क्लिप टुंडानी नावाच्या हत्तीची आहे. यामधील हत्ती एका पॅडलिंग पूलमध्ये चिखलात पडून मस्त मजा घेत आहे. त्याच्या आजूबाजूला आणकी काही हत्ती असून टुंडानी मात्र सर्वात जास्त मजा घेतानाल दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला टुंडानी  10 सेकंद केवळ आराम करतो. पण नंतर तो चिखलात आणि पाण्यात खेळायला सुरुवात करतो. मध्येच खाली पडून तो आनंद घेताना दिसत आहे. तर हा मजेशीर व्हिडीओ तुम्हीही पाहा…

व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल

हा व्हिडीओ शेल्ड्रिक वाइल्डलाइफ या ट्विटर अकाऊंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. हा एक ट्रस्ट असून अनाथ हत्तींच्या रेस्क्यू आणि पुनर्वसनासाठी काम करतो.  इंडिया टुडेच्या  रिपोर्टनुसार टुंडानी हा हत्तीही एक रेस्क्यु करण्यात आलेला हत्ती असून 2013 मध्ये त्याला वाचवण्यात आलं होतं. व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट होताच  सोशल मीडियावर 8 हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकजण व्हिडीओला लाईक करुन कमेंट करत आहेत. एका युजरने  व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे,‘हा हत्ती खूप भारी आहे.’ तर दुसरा युजर लिहितो, ‘किती मजा घेऊन हा हत्ती खेळतो आहे.’ तर एकजण लिहितो,‘हाच असतो आनंद आणि स्वतंत्र्य’

इतर बातम्या :

Video | तरुणीचा तरुणासोबत स्टंट, पण मध्येच घडला विचित्र प्रकार, पाहा व्हिडीओ

Video | लबाड कावळ्याचा चक्रावून सोडणारा कारनामा, चक्क पैशांची करतो चोरी, व्हिडीओ व्हायरल

Video | आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच, पैसे खिशात टाकतानाचा ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(Video of Elephant fun in the mud his adorable gestures winning hearts over internet)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI