Video | ‘बचपन का प्यार’नंतर आता ‘बेला चाओ’ची धूम, सहदेवच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

सहदवेन गायलेल्या या गीताच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो अतिशय मजेदार पद्धतीने बेला चाओ हे गीत गाताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये बेला चाओ हे गीत सुरु असल्याचे दिसत आहे. याच गितासोबत सहदेवसुद्धा गात आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी सहदेव गोड हसला आ

Video | 'बचपन का प्यार'नंतर आता 'बेला चाओ'ची धूम, सहदेवच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
SAHDEV

मुंबई : गीत गाण्याच्या खास शैलीमुळे चर्चेत आलेल्या सहदेवला सगळा भारत ओळखतो. त्याच्या बचपन का प्यारने लोकांना वेड लावलं होतं. हाच सहदेव आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने मनी हाईस्ट या वेबसिरीजमधील प्रसिद्ध गाणे ‘बेला चाओ’ हे गीत गायले आहे. या गीताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (bachpan ka pyar fame sahdev singing bela chao song video went viral on social media)

बचपन का प्यारनंतर सहदेवचे बेला चाओ

सध्या मनी हाईस्ट या वेब सिरीजचा पाचवा सिझन प्रदर्शित झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वेगवेगळे मिम्स शेअर केले जात आहेत. तसेच या सिरिजमधील बेला चाओ हे सुप्रसिद्ध असे गीत लोक आवडीने गात आहेत. सध्या बचपन का प्यार या गाण्यामुळे चर्चेचा विषय ठरलेल्या सहदेवनेदेखील हे गाणे गायले आहे. सहदवेन गायलेल्या या गीताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तो अतिशय मजेदार पद्धतीने बेला चाओ हे गीत गाताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये बेला चाओ हे गीत सुरु असल्याचे दिसत आहे. याच गितासोबत सहदेवसुद्धा गात आहे. तसेच व्हिडीओच्या शेवटी सहदेव गोड हसला आहे.

बचपन का प्यारने दिली प्रसिद्धी

बचपन का प्यार या गाण्याने सहदेवला ओळख मिळवून दिली. त्याने गायलेले हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुप्रसिद्ध रॅपर बादशाहने त्याच्यासोबत एक गाणं गायलं. तसेच या गाण्यामुळे सहदवेला इंडियन आयडॉल 12 मध्येही जाता आलं. एवढंच नाही तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीसुद्धा सहदेवचा सत्कार केला होता.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Vatan Jaiswal (@vatan_jaiswal)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सहदेवने गायलेलं बेला चाओ हे गीत नेटकऱ्यांना चांगलेच आवडले आहे. लोक या व्हिडीओला शेअर करत आहेत. तर काही नेटकरी या व्हिडीओवर मिश्किल प्रतिक्रियादेखील देत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ vatan_jaiswal या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!

VIDEO : हत्तीची चिखलात धमाल मस्ती, मन जिंकतील ‘ही’ मनमोहक दृश्य

VIDEO : ‘जेसीबी की खुदाई’नंतर जेसीबीचा नवा व्हिडीओ, थेट बीचवर तरुणाला डिवचणारा जेसीबी, भन्नाट व्हिडीओ

(bachpan ka pyar fame sahdev singing bela chao song video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI