भाजप खासदाराच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ उभ्या उभ्या पेटली, कल्याणमधील प्रकार

BJP MP car caught in fire : भाजप खासदारांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ (Scorpio) गाडी रस्त्यावर उभी असताना, गाडीने अचानक पेट घेतला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 14:37 PM, 27 Feb 2021
भाजप खासदाराच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ उभ्या उभ्या पेटली, कल्याणमधील प्रकार
भाजप खासदार कपिल पाटील यांची कार जळून खाक

ठाणे : भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील (BJP MP Kapil Patil) आज कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड (Kalyan) येथे आले होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्या खाली पार्क करून ते पाटीदार भवन हॉल (Patidar Bhawan) येथील कार्यक्रमासाठी गेले. यादरम्यान पाटील यांच्या ताफ्यातील स्कॉर्पिओ (Scorpio) गाडी रस्त्यावर उभी असताना, गाडीने अचानक पेट घेतला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली.

याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले (Scorpio car from BJP MP Kapil Patil convoy caught fire near Kalyan Maharashtra)

दरम्यान, ही स्कॉर्पिओ अचानक कशी काय पेटली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. खासदारांच्या ताफ्यातील गाडी पेटल्याने परिसरात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं? 

भाजप खासदार कपिल पाटील (BJP MP Kapil Patil) हे कल्याण शहाड (Kalyan) इथे गेले होते. साहजिकच खासदारांसोबत त्यांचा लवाजमाही होता. त्यांच्या ताफ्यात स्कॉर्पिओही होती. कपिल पाटलांचा ताफा कार्यक्रमस्थळी पोहोचला. सर्व गाड्या पार्क झाल्यानंतर, खासदार महोदय कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यावेळी अचानक एका गाडीतून धूर येऊ लागला.

बघता बघता स्कॉर्पिओने पेट घेतला. गाडीने अचानक पेट घेतल्याने सगळीकडे एकच धावपळ झाली. उपस्थितांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आग आटोक्यात आली नाही. त्याचदरम्यान, उपस्थितांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

VIDEO : भाजप खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली

(Scorpio car from BJP MP Kapil Patil convoy caught fire near Kalyan Maharashtra)