AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याला कपडे काढायला लावले, अश्लील व्हिडीओ बनवला.. नव्या ‘डॉन’ची दहशत! नेमकं काय झालं वाचा

एका 16 वर्षीय मुलाला काही लोकांनी जबरदस्तीने उचलून नेले आणि तिचा अश्लील व्हिडीओ बनवला. नेमकं काय प्रकरण आहे? चला जाणून घेऊया...

त्याला कपडे काढायला लावले, अश्लील व्हिडीओ बनवला.. नव्या ‘डॉन’ची दहशत! नेमकं काय झालं वाचा
Crime Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 30, 2025 | 5:07 PM
Share

एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एक 16 वर्षांचा मुलगा, जो आपल्या कुटुंबासह ब्रह्मपुरीत राहतो, एका रात्री तो आपल्या घराबाहेर सोफ्यावर झोपला होता. तेव्हा पहाटे 4:15 वाजता परिसरातील कुख्यात गुंड अंकुश शर्मा तिथे पोहोचला. अंकुशने मुलाची कॉलर पकडून त्याला जागं केलं आणि त्याला पाच-सहा कानशिलात लगावल्या. जवळच झोपलेला त्याचा अल्पवयीन मित्र घाबरून गप्प राहिला. त्याने अंकुशला मारहाण न करण्याची विनवणी केली, पण त्यालाही धमकावलं आणि राहुलला जबरदस्तीने दुसऱ्या गल्लीत घेऊन गेला.

गल्लीत पोहोचताच अंकुशने राहुलला कपडे काढण्याचा आदेश दिला. भीतीमुळे राहुलला नकार देण्याची हिंमत झाली नाही, कारण अंकुशने त्याला चांगलाच मारहाण करण्याची धमकी दिली होती. राहुलला नाईलाजाने कपडे काढावे लागले. एवढंच नाही, तर अंकुशने राहुलच्या मित्राला त्याच्या नग्न अवस्थेत व्हिडीओ बनवण्याचा आदेश दिला. मित्राने सुरुवातीला नकार दिला, पण अंकुशच्या धमकीपुढे त्यालाही नमावं लागलं. त्याने घाबरत-घाबरत आपल्या फोनवर व्हिडीओ बनवला. यानंतर अंकुशने राहुलला उठाबशा करण्यास सांगितलं आणि स्वतःला परिसराचा ‘डॉन’ सांगत धमकी दिली की, जर राहुलला इथे राहायचं असेल, तर त्याला त्याच्यापासून घाबरून राहावं लागेल.

वाचा: वर्षाला १० कोटी खर्च करुनही या देशाचे प्राइम मिनिस्टर हाउस खालीच, काय आहे नेमकं कारण? अनेकांचा राहण्यास नकार

आईला सांगितलं सत्य

घरी पोहोचल्यावर मुलाने रडत-रडत आपल्या आईला सर्व गोष्ट सांगितली. आईने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी मुलाला जेपीसी रुग्णालयात नेलं, जिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दिल्लीतील न्यू उस्मानपुर पोलिस ठाण्यात अंकुशविरुद्ध मारहाण, अपहरण, ओलीस ठेवणे आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अंकुशला अटक केली. तपासात समोर आलं की, अंकुशवर यापूर्वीच खून, 2020 च्या दिल्ली दंगली, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow Us
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?