वर्षाला १० कोटी खर्च करुनही या देशाचे प्राइम मिनिस्टर हाउस खालीच, काय आहे नेमकं कारण? अनेकांचा राहण्यास नकार
या देशात पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान अनेक वर्षे रिकामे पडले होते. त्याला भुताटकीचे ठिकाण असे म्हटले जाते आहे. सध्याचे पंतप्रधान हे अगदी नाईलाजाने तिथे राहात आहेत.

होय, हे अगदी खरे आहे की एका देशातील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान अनेक वर्षे रिकामे पडले होते. कोणताही पंतप्रधान तिथे जाऊन रहायला तयार नव्हता. एक वर्षापूर्वी पंतप्रधान तिथे गेले खरे, पण त्यांची इच्छा नसतानाही त्यांना जावे लागले होते. सुरक्षेच्या कारणांमुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले होते. खरे तर गेल्या काही दशकांपासून कोणतेही पंतप्रधान तिथे राहायला तयार नाहीत, कारण हे ठिकाण भुताटकी म्हणून ओळखले जाते. या घरासाठी दरवर्षी १० कोटी रुपये खर्च केला जातो. तरीही कोणतेही पंतप्रधान तेथे राहायला तयार नाही. आता हे नेमकं कोणत्या देशातील आहे चला जाणून घेऊया…
आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहोत तो देश दुसरा तिसरा कोणी नसून जपान आहे. येथील पंतप्रधानांचे निवासस्थान टोकियोमध्ये पंतप्रधानांच्या कार्यालयाशेजारी आहे. 1930 च्या दशकात येथे दोन मोठ्या घटना घडल्या. 1932 मध्ये येथे पंतप्रधान इनुकाई त्सुयोशी यांची हत्या झाली, तर 1936 मध्ये बंडखोर सैनिकांनी या ठिकाणावर हल्ला केला. या हल्ल्यात तत्कालीन पंतप्रधान केइसुके ओकादा यांच्या मेहुण्यासह चार जणांची हत्या झाली.
वाचा: व्हिस्कीच्या पेगमध्ये किती पाणी मिसळावे? विज्ञान काय सांगते वाचा
या घटनांनंतर असे मानले जाऊ लागले की हे निवासस्थान राहण्यासाठी सुरक्षित नाही आणि येथे मारल्या गेलेल्या लोकांचे आत्मे तेथे भटकतात. अनेकदा येथे सैनिकांच्या कवायतीच्या आवाजासारखे आवाज ऐकू येतात, असेही सांगितले जाते. या घटनांमुळे हे ठिकाण “भुताटकी” मानले जाऊ लागले आणि जपानी नेत्यांमध्ये एक प्रकारची मानसिक भीती निर्माण झाली.
अनेक पंतप्रधानांनी येथे राहणे टाळले
हे निवासस्थान पंतप्रधानांच्या कार्यालयाशी जोडलेले आहे, पण आधुनिक सुरक्षेच्या निकषांवर ते पूर्णपणे खरे उतरत नाही. जपानच्या अनेक पंतप्रधानांनी मान्य केले की कार्यालयाशेजारी राहणे सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. जपानी पंतप्रधान सामान्यतः टोकियोमध्ये आधीपासूनच चांगल्या आणि सुरक्षित खासगी घरांमध्ये राहतात. शिंजो आबे, योशिहिदे सुगा आणि फुमियो किशिदा यांनीही अधिकृत निवासस्थानात राहण्याचा निर्णय घेतला नाही.
2012 ते 2021 या काळात हे सरकारी निवासस्थान पूर्णपणे रिकामे होते. शिंजो आबे (2012–2020) यांनी येथे न राहण्याचा निर्णय घेतला. योशिहिदे सुगा (2020–21) यांनीही येथे राहणे टाळले. फुमियो किशिदा (2021–2023) यांनीही आपल्या खासगी घरातच राहण्याचा निर्णय घेतला आणि अधिकृत निवासस्थान बहुतेक रिकामेच राहिले. 2023 मध्ये जेव्हा एका संशयिताने पंतप्रधान किशिदा यांच्यावर स्फोटक फेकले, तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्यांना अधिकृत निवासस्थानात स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला. आता ते बहुतेक तिथेच राहतात, पण या निवासस्थानाचा “भुताटकी” हा टॅग आजही जपानी प्रसारमाध्यमे आणि लोकप्रिय संस्कृतीत चर्चेचा विषय आहे.
भुताटकी शक्तींच्या अफवा
जपानी पंतप्रधानांच्या या निर्णयामुळे त्या अफवांना बळ मिळाले की सोरी कोटेईमध्ये अलौकिक शक्तींचा वास आहे, ज्या तिथे राहणाऱ्यांना हानी पोहोचवतात. मात्र, या अफवा वेगाने पसरल्यानंतर पंतप्रधानांच्या प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की पंतप्रधान निवासस्थानात भूतांचा वास असल्याबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही. तरीही, या निवेदनानंतरही पंतप्रधान तिथे गेले नाहीत. याचा उल्लेख इंडिपेंडेंटच्या एका अहवालात आहे.
देखभालीवर दरवर्षी 10 कोटींहून अधिक खर्च
रिकाम्या पडलेल्या पंतप्रधान निवासस्थानाच्या देखभालीसाठी लागणारी रक्कम हा आणखी एक मुद्दा आहे. दरवर्षी सुमारे 1.1 दशलक्ष पाउंड (10 कोटी 32 लाख रुपये) इमारतीच्या स्वच्छतेसाठी आणि बागेची देखभाल करण्यासाठी खर्च होतात. यासाठी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. यामुळे विरोधी पक्ष सातत्याने सध्याच्या पंतप्रधानांवर तिथे राहण्यासाठी दबाव टाकत आहे.
