लग्नाच्या 13 वर्षानंतर प्रियकर भेटला, मग मनावर कसला ताबा, पतीने मग केले असे काही की…

Husband Wife : तर त्यांच्या लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली होती. पण या संसारवेलीवर फुल का उमलले नव्हते. त्यातच या संसाराला अजून एक मोठे वादळ आले. तिच्या आयुष्यात तो पुन्हा आला. त्याची कुणकुण पतीला लागली आणि ...

लग्नाच्या 13 वर्षानंतर प्रियकर भेटला, मग मनावर कसला ताबा, पतीने मग केले असे काही की...
पती, पत्नी आणि तो...
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 4:31 PM

सोनम रघुवंशी आणि मेरठमधील सौरभ-मुस्कान सारख्या घटनांनी समाज हादरलेला आहे. मुली इतक्या क्रूर कशा होऊ शकतात, असा प्रश्न समाजाला पडला आहे. पण ही कथा या सर्व घटनाक्रमांत वेगळी ठरली आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे हे प्रकरण समोर आले आहे. लग्नाच्या 13 वर्षानंतर या महिलेच्या जीवनात तिचा प्रियकर आला. मग तिने मागे पाऊल टाकले नाही. दोघांमध्ये चोरून चोरून भेटी झाल्या. त्याची कुणकुण पतीला लागली. मग पुढे जे झाले त्याने तुम्हाला धक्का बसेल.

काय आहे प्रकरण?

अमेठीजवळील गावातील सतई या तरुणाचे कुटमारा गावातील सीमासोबत लग्न झाले होते. लग्नाला 13 वर्षे पूर्ण झाली होती. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित होते. पण त्यांना मुलबाळ नव्हते. या एकाच गोष्टीचे दोघांना दुख होते. त्यातच सीमा हिला तिचा प्रियकर शिवानंद अमेठीला दिसला. दोघांमध्ये चर्चा झाली. पुढे संपर्क वाढला. पत्नी आता पूर्वीसारखी वागत नसल्याचे सतईच्या लक्षात आले. त्याने तिला विचारले. त्यावर ती काही बोलली नाही. पण एकदिवस सतईने त्या दोघांना पकडले. दोघांना घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.

प्रियकराशी लावून दिले लग्न

पोलीस ठाण्यात आल्यावर सतईने बायकोचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे शिवानंद, सीमा आणि पोलिसांना पण धक्का बसला. त्यांनी कोर्टात ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. सतई सीमाला घेऊन घरी गेला. तिच्या घरच्यांना बोलावून घेतले. त्याच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. सीमाचे शिवानंदसोबत लग्न लावण्याची त्याची इच्छा त्याने व्यक्त केली. त्यानंतर त्याने सीमाला तिच्या माहेरी सोडले. पुढे दोघांच्या नोंदणी विवाहाची प्रक्रिया सुद्धा त्यानेच करून दिली. शिवानंदने सतईचे आभार मानले. सीमाला आनंदात ठेवणार असल्याचे त्यांने सांगितले.

सतईच्या भूमिकेचे कौतुक

सतईने पत्नी सीमाला शिवानंदसोबत लग्न करणार का, असा पहिला प्रश्न केला होता. तिने तात्काळ होकार दिल्याने सतईने मग कोर्ट प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांच्या नोंदणी विवाहाची तयारी पण करून दिली. दोघांचे लग्न झाले. सतईच्या मते पत्नी प्रियकरसोबत राहू इच्छित होती. त्यामुळे तो या प्रेमाच्या आड येऊ इच्छित नव्हता. गावकऱ्यांनी सतईच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.