AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

500 रुपयांच्या नोटांचा ढीग! बंडलांचा डोंगर पाहून पोलिस अवाक, मग चौकशीत समोर आले ते सत्य

500 Notes : 500 रुपयांच्या नोटांचा ढीग सापडल्याचा पोलिसांना कॉल आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घरातील बेडवर आणि जमिनीवर नोटांचा ढीग पडलेला होता. हा सर्व प्रकार पाहून पोलीस पण चक्रावून गेले. काय आहे हे प्रकरण?

500 रुपयांच्या नोटांचा ढीग! बंडलांचा डोंगर पाहून पोलिस अवाक, मग चौकशीत समोर आले ते सत्य
500 रुपयांच्या नोटांचा डोंगरImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 3:38 PM
Share

तर एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा घटनाक्रम होता. स्थानिक रहिवाशांनी एका घरात नोटांचा डोंगर असल्याचा पोलिसांना कॉल केला. तोपर्यंत तिथे बघ्यांची खूप गर्दी झाली होती. या घरातील बेडरूममध्ये कॉट, जमिनीवर 500 रुपयांच्या नोटाच नोटा पडलेल्या होत्या. इतकेच कमी की काय, तिथल्या बॉक्समध्ये सुद्धा नोटा होत्या. कोणीतरी नोटा छापत असल्याचा दावा करत होते, तर कोणी या नोटा खोट्या असल्याचे म्हणत होते. हा सर्व प्रकार पाहून पोलीस पण चक्रावून गेले. काय आहे हे प्रकरण?

कर्नाटकमध्ये बंडलांचा डोंगर

कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील (Uttara Kannada districts) दांदेली नगरातील (Dandeli City) एका घरात नोटांची बंडल सापडत असल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घरात 500 रुपयांच्या नोटांचा ढीगच पडलेला होता. काही खाली बॉक्समध्ये सुद्धा नोटांची बंडल दिसत होती. कॉटवर मोठ्या प्रमाणात पैशांच्या नोटा होत्या. जवळच ठेवलेल्या एका बॉक्समध्ये बंडलांचा ढीग पडलेला होता. पण हे प्रकरण दुसरंच असल्याचे पोलिसांच्या थोड्याच वेळात तपास दरम्यान लक्षात आले.

पोलिसांना पडला प्रश्न?

पोलिस घटनास्थळी पोहचल्यावर या नोटा ना खऱ्या आहेत ना खोट्या, त्या तर एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या प्रॉप्स असल्याची माहिती समोर आली. चित्रपटाच्या शुटिंगविषयी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. मग येथे या नोटा आल्या कशा? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांदेली नगरमधील गांधीनगर परिसरात ही घटना समोर आली. या नोटा नकली असल्याचा दावा करण्यात येत होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी नोटा निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) लोगो नसल्याचे समोर आले. या नोटांवर भारतीय गव्हर्नरची स्वाक्षरी नसल्याचे पण आढळले. त्यामुळे या नोटा ना खऱ्या आहेत ना खोट्या असे पोलिसांच्या लक्षात आले.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेविषयी माहिती दिली. त्यानुसार, या नोटांच्या मागील बाजूला या नोटा चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. या नोटांवर क्रमांकाची मालिका नव्हती. सीरीयल नंबर नव्हता. नकली नोटांवर एक सीरीयल नंबर असतो. पण या नोटांवर तसा सीरीयल नंबर नव्हते. त्यामुळे या नकली नोटा नसल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी प्रकरणात येथे राहणार्‍या भाडेकरूला ताब्यात घेतले. या नोटा घरात कशा आल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात त्या का आणण्यात आल्या. त्याचा कशासाठी वापर करण्यात येणार होता, याचा पोलीस कसून शोध घेत आहे. या नोटांचा वापर कुणाला फसवण्यासाठी, बँकेला, व्यावसायिकाला गंडा घालण्यासाठी तर करण्यात येणार नव्हता ना, यादृष्टीने सुद्धा यंत्रणा तपास करण्यात जुंपल्या.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ