बायकोला द्यावी लागणार 5 हजार 540 कोटींची पोटगी, सर्वात महागडा घटस्फोट कुणाचा? वाचा सविस्तर

ब्रिटनमधील एका कोर्टाने दुबईच्या शेखला त्याची पहिली बायको आणि मुलांना 554 मिलीयन पाउंडची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

बायकोला द्यावी लागणार 5 हजार 540 कोटींची पोटगी, सर्वात महागडा घटस्फोट कुणाचा? वाचा सविस्तर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 21, 2021 | 11:04 PM

ब्रिटनमधील एका कोर्टाने दुबईच्या शेखला त्याची पहिली बायको आणि मुलांना 554 मिलीयन पाउंडची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम भारतीय रुपयानुसार 5540 कोटी रुपये होते. ब्रिटमधील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी हा एक घटस्फोट आहे. लंडनमधील कोर्टाने शेख मोहम्मद अल मकतूम यांना राजकुमारी हया बिंत अल-हुसेन यांच्या सुरक्षेसाठी आणि इतर बाबींसाठी तीन महिन्यांच्या आत 251.5 मिलीयन पाउंड देण्याचे आदेश दिले आहेत.

जगातल्या महागड्या घटस्फोटापैकी एक

कोर्टाने पुढे म्हटले आहे की, जोपर्यंत मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेख यांना 11 मिलीयन पाउंड वर्षाला मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे लागतील. सुरक्षा म्हणून 290 मिलीयन पाऊंड बँकेत जमा करावे लागणार आहेत. कोर्टाने ही घटस्फोटानंतर राजकुमारी हया यांना आर्थिक मदत होईल असे म्हटले आहे. दुबईच्या शासकाने आपली पत्नी आणि तिच्या कायदेविषयक टीमचे फोन हॅक करण्यास शेख यांनी सांगितले होते. शेख यांनी त्यांच्या बाजूने कोणताही दावा केला नाही.

मुलांना सुरक्षा पुरवण्याबाबत विचार-शेख

शेख यांच्याकडून परिवराच्या देखभालीसाठी जाणारी रक्कम अत्यंत मोठी आहे. वर्षिक सुरक्षेची रक्कम भरताना मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना सर्व रक्कम द्यावी लागणार आहे. मी नेहमीच माझ्या मुलांच्या सुरक्षेचा विचार केल्याचे शेख यांनी कोर्टात म्हटले आहे. लंडनमधील फॅमिली न्यायालये अशा केस निकालात काढण्यात प्रसिद्ध राहिली आहेत. राजकुमारी हया यांच्या दाव्यानुसार या कारवाईवेळी त्यांना घेरण्यात आले होते, शेख याचे पाळत ठेवण्याने त्यांना त्रास झाला, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा जगातल्या सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक घटस्फोट ठरला आहे.

Winter Session : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 26 विधेयके आणि अध्यादेश मांडले जाणार

दर महिन्याला मासिक पाळी येत राहिली तरीही अचानक दिला बाळाला जन्म, प्रकरण काय? वाचा सविस्तर

अँटी-इंडिया कंटेंट शेअर करणारे 20 यूट्यूब चॅनेल्स बॅन, पाकिस्तानमधून होणाऱ्या कुरापतींना केंद्राचा लगाम

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें