AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटी-इंडिया कंटेंट शेअर करणारे 20 यूट्यूब चॅनेल्स बॅन, पाकिस्तानमधून होणाऱ्या कुरापतींना केंद्राचा लगाम

IT कायदा आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोडच्या मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांनुसार (इंटरमीडियरी गाइडलाइन्स) 20 YouTube चॅनेल आणि दोन वेबसाइट हटवण्यात आल्या आहेत. हे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट कथितरित्या पाकिस्तानमधून कार्यरत होते आणि भारतविरोधी कंटेंट (anti-India content) शेअर होते.

अँटी-इंडिया कंटेंट शेअर करणारे 20 यूट्यूब चॅनेल्स बॅन, पाकिस्तानमधून होणाऱ्या कुरापतींना केंद्राचा लगाम
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 10:25 PM
Share

नवी दिल्ली : IT कायदा आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोडच्या मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वांनुसार (इंटरमीडियरी गाइडलाइन्स) 20 YouTube चॅनेल आणि दोन वेबसाइट हटवण्यात आल्या आहेत. हे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट कथितरित्या पाकिस्तानमधून कार्यरत होते आणि भारतविरोधी कंटेंट (anti-India content) शेअर होते. याबाबतची माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे. (Centre Bans 20 Anti-India YouTube channels, Two Websites)

अहवालात म्हटले आहे की I&B सचिव अपूर्व चंद्रा यांनी YouTube आणि दूरसंचार विभागाला संबंधित कंटेंट काढून टाकण्याचे किंवा देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे उल्लंघन केल्यामुळे आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एका अधिकृत निवेदनात, I&B अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या मदतीने पाकिस्तानकडून ‘anti-India content’ शेअर केला जात होता.

YouTube वर शोधलेल्या ग्रुप्सपैकी एक ‘नया पाकिस्तान’ नावाचा ग्रुप होता ज्याचे 2 मिलियन्सहून (20 लाख) अधिक सब्सक्रायबर्स होते. हे चॅनल काश्मीर, भारतातील शेतकऱ्यांचा विरोध, कलम 370 आणि अयोध्या अशा विविध मुद्द्यांवर खोट्या बातम्या चालवत होते. बंदी घातलेल्या YouTube चॅनेल्सच्या सब्सक्रायबर्सची एकूण सदस्य संख्या 3.5 मिलियन्सपेक्षा (35 लाख) जास्त असल्याचा अंदाज आहे, तर एकूण दर्शक संख्या (टोटल व्ह्यूअर काउंट ) 500 मिलियन्सपेक्षा (50 कोटी) जास्त आहे.

YT चॅनलच्या माध्यमातून भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न

‘नया पाकिस्तान ग्रुप’ नावाचे आणखी एक पोर्टल आणि 15+ यूट्यूब चॅनेलवरुन (ज्यांचे 10 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत) भारतविरोधी कंटेंट शेअर करत असल्याचे आढळले. या वाहिनीने काश्मीरमधील कलम 370, तालिबानी सैन्य, तुर्की सेना, ओटोमन आर्मी आणि अयोध्येतील राम मंदिर यांसारख्या मुद्द्यांवरून भारतात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे या अहवालात दिसून आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे चॅनेल आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा निर्णय 48 तासांच्या आत इंटर-डिपार्टमेंट कम्युनिटी (IDC) समोर दाखवला जाईल. IT नियमांच्या कलम 16 नुसार, I&B मंत्रालय आवश्यक कंटेंट ब्लॉक करू शकते.

या यूट्यूब चॅनेलला पूर्वी सुरक्षा एजन्सींनी हिरवा झेंडा दाखवल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आयटी मंत्रालयाने अधिक माहितीसाठी तपास केला. अधिक तपशील शेअर करताना, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, “आयटी नियम, 2021 अंतर्गत अँटी इंडिया प्रोपोगेंडा वेबसाइट्सवर आणीबाणीच्या अधिकारांतर्गत बंदी घालण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.”

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(Centre Bans 20 Anti-India YouTube channels, Two Websites)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.