सापाला पाहून बेडुक पळाला, पण..सापाने अशी झेप…धक्कादायक video
Viral Video: या व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, हिरव्यागार परिसरात एक साप बेडकाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहे. या दोघांचा जीवन मरणाचा संघर्ष धक्कादायक आहे.

सोशल मीडियावर अनेकदा हिंस्रप्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतू असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक व्हाल. हा व्हिडीओ एका गार्ड किंवा पार्कचा वाटत असून त्यात एका बेडुक आणि सापाचा संघर्ष दिसत आहे. साप त्याच्या आवडत्या बेडुक या प्राण्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करताना या व्हिडीओत दिसत आहे. बेडुक आपले प्राण वाचण्यासाठी पळताना दिसत आहे. परंतू अखेर या दोघांच्या लढाईत कोणाचा विजय होतो हे पाहण्यासारखे आहे.
जीव वाचवण्यासाठी खांबावर चढला बेडुक
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की एका हिरव्यागार गार्डनमध्ये साप बेडकाची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहे. आपला जीव संकटात असलेला पाहून बेडुक लागलीच उडी मारत जवळील एका लोखंडाच्या खांबावर तो चढत आहे. बेडकाला वाटते खांबावर चढल्यावर आता आपले प्राण वाचतील. साप आपल्यापर्यंत पोहचणार नाही असा त्या बेडकाचा समज असतो. त्यामुळे बेडुक खांबावर अगदी वरपर्यंत चढतो. परंतू त्याचा हा डाव त्याच्यावर उलटतो.
साप देखील खांबावर चढला…
व्हिडीओच्या पुढच्या भागात खतरनाक घडामोड घडते. साप आता हार मानण्याच्या स्थितीत दिसत नाही. आणि एक क्षणही न गमावता विजेच्या चपळाईने साप थेट हवेत झेप घेताना दिसत आहे. साप इतकी उंच झेप घेतो की बेडकाच्या जवळच जाऊन तो पोहचतो.अखेर त्या बिचाऱ्या बेडकाचा पाय त्या सापाच्या तोंडात जाताना दिसत आहे. त्यामुळे बेडकाचे सर्व प्रयत्न वाया जाताना दिसत आहे. अखेर त्या बेडकाची शिकार साप करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर यूजर्सना धक्का
हा धक्कादायक व्हिडीओ पाहून युजर्स हैराण झाले आहे. युजर या गोष्टीनी हैराण होतात की साप इतक्या विजेच्या वेगाने त्या गुळगुळीत पोलवर कसा काय झेप घेतो हे पाहण्यासारखे आहे. व्हिडीओ पाहून युजर्स वेगवेगळे कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलेय की मला वाटले की पोलवर चढून हा बेडुक वाचेल..परंतू साप तर उस्ताद निघाला. दुसऱ्या एका युजरने कमेंट्स केली की निसर्गाचा नियम खूपच निर्दयी आहे. जेव्हा भूक लागते तेव्हा कोणताही शिकारी सर्व मर्यादा सोडतात. तिसऱ्या एका युजरने लिहिले की एवढ्या उंचीवर बेडुक जाऊन ज्याप्रकारे सापाने झेप घेत तो उभा राहिला हे आश्चर्यकारक आहे.
येथे व्हिडीओ पाहा –
View this post on Instagram
