AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोमध्ये पाणी पिण्यासह खाण्यावरही बंदी, नियम मोडल्यास 37 हजारांचा दंड; मराठी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

मेट्रोने प्रवास करताना पाणी पिलो तर मोठा दंड भरावा लागू शकतो, हो हे खरं आहे. या नियमाचं उल्लंघन केलं तर तब्बल ३७ हजार रुपयांचा फाईन बसू शकतो. कुठे आहे हा नियम?

मेट्रोमध्ये पाणी पिण्यासह खाण्यावरही बंदी, नियम मोडल्यास 37 हजारांचा दंड; मराठी तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
तर.. थेट ३७ हजारांचा दंडImage Credit source: social media
| Updated on: Oct 12, 2026 | 6:30 PM
Share

मेट्रोने प्रवास करताना सुरक्षेसाठी अनेक देशांमध्ये विविध नियम ठरवेले आहेत. काही मुलभूत गोष्टी असतात, ज्यांचे पालन आपण करतोच पण त्याशिवाय काही ठिकाणी असेही नियम आहेत की जे पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. या नियमांनी खिशाला फटकाही बसू शकतो. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात.

खरेतंर आपण प्रवास करताना वैध QR तिकीट, पेपर तिकीट किंवा स्मार्ट कार्ड असल्याशिवाय प्रवास करत नाही. त्याशिवाय काही नियमांचं आपोआप पालन करतोच. ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये चढताना धक्काबुक्की न करता रांगेत उभे राहातो. प्लॅटफॉर्मवर असताना पिवळी रेषा ओलांडत नाही. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला आणि लहान मुलांसोबत असलेल्या प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या जागा देतो. ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी आधी उतरणाऱ्या प्रवाशांना उतरू देतो, अशा काही नियमांचा समावेश आहे. असं करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्येही असतात. जे आपण पाळले नाही तर आपल्याला कोणताही दंड वगैरे नसतो. उलट त्याने आपल्या सर्वांची एक प्रवासी म्हणून व्यवस्थित सोय लागते. पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, तुम्ही जर मेट्रोमध्ये पाणी प्यायलात तर तुम्हा दंड बसू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Anuradha & Amar (@anu_amarp)

सिंगापूरमध्ये राहणाऱ्या एका मराठी तरुणाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत तेथील मेट्रोमधील नियमांची माहिती दिली आहे. सिंगापूरच्या मेट्रोमध्ये प्रवास करताना प्रवाशांना पाणी पिण्यासह खाण्यावरही निर्बंध आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास 500 सिंगापूर डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 37 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. संबंधित तरुणाने व्हिडीओमध्ये मेट्रोतील सूचना फलक दाखवत या नियमाकडे लक्ष वेधले.

सिंगापूरच्या मेट्रोला एमआरटी (मास रॅपिड ट्रान्झिट) असे म्हणतात. या मेट्रोमध्ये स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी खाण्यापिण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांनी मेट्रोमध्ये धूम्रपान करणे आणि प्रतिबंधित वस्तूंची वाहतूक करणेही टाळणे आवश्यक आहे. जमिनीवर पाणी सांडल्यास प्रवाशांचा पाय घसरून अपघात होण्याची शक्यता असते. तसेच गर्दीच्या वेळी खाण्यापिण्याचे पदार्थ हाताळणे गैरसोयीचे ठरू शकते. त्यामुळे हे नियम महत्त्वाचे मानले जातात. मात्र, प्रवासादरम्यान अचानक तहान लागल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावे, याबाबत नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी