AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या महिलेला हवाय वारसदार, 60 कोटींची संपत्ती देणार वारसाला; तुमच्यापर्यंत हा मेसेज आलाय का?

60 Crores Property : इन्स्टाग्राम आणि एसएमएसवर एक मॅसेज खूप व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आपल्या 60 कोटींच्या संपत्तीसाठी वारस शोधत आहे. तुमच्याकडे सुद्धा हा मॅसेज आला आहे का? तुम्हाला सुद्धा कोट्याधीश होण्याची संधी मिळाली आहे का? काय आहे सत्य?

या महिलेला हवाय वारसदार, 60 कोटींची संपत्ती देणार वारसाला; तुमच्यापर्यंत हा मेसेज आलाय का?
हा मॅसेज तुम्हाला आला का?Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 06, 2025 | 3:39 PM
Share

“माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, माझ्याकडे अवघा एक महिना उरला आहे. मी हा प्रवास आता एकटी करणार आहे. या जगाला शांततेने अखेरचा निरोप देणार आहे. माझी मुलं नाहीत. मला एकच खंत आहे की, तुमच्यासोबत मी माझे आयुष्य व्यतीत करू शकली नाही. तूच माझं पहिलं प्रेम आहे आणि तू अखेरपर्यंत माझ्या हृदयात असशील. मी माझी 60 कोटी रुपयांची संपत्ती तुझ्यासाठी सोडून जात आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल…”

तुम्हाला पण असाच मॅसेज आला आहे का? जर आला असेल तर सावध व्हा. अशा मॅसेजवर किंचित पण विश्वास ठेवू नका. सायबर स्कॅमर आणि हॅकर्स यांची ही चाल आहे. त्यांच्या एका लिंकवर क्लिक करु तुम्ही तुमच्याकडे आहे ती संपत्ती पण गमावून बसाल.

कशी होते फसवणूक?

युझर्सला अशा फेक लिंक पाठविण्यात येतात. हे दुसऱ्याच वेबसाईटवर घेऊन जातात. त्या ठिकाणाहून तुमच्याकडून नाव, मोबाईल क्रमांक, बँकेची सविस्तर माहिती आणि OTP घेण्यात येतो. त्यानंतर स्कॅमर तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे काढतो. काही मॅसेज ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर फोन हॅक करण्यात येतो.

स्कॅम आणि हॅकिंगपासून वाचण्यासाठी काय करावे?

सातत्याने असे मॅसेज येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्याला प्रतिसाद देऊ नका. अथवा सायबर पोलिसांना याविषयीची माहिती द्या. जर एखादी अज्ञात व्यक्ती वा नंबर वरून तुम्हाला झटपट श्रीमंत करण्याचे आश्वासन देण्यात येत असेल तर समजून घ्या हा स्कॅम आहे. हा घोटाळा आहे.

कधी ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका. OTP, पासवर्ड, ATM कार्ड याची माहिती द्या. या बँक डिटेल्सची कधीच कोणाला माहिती देऊ नका. अशा काही लिंक आल्यास विचार करून ती उघड. मॅसेजमध्ये लिंक असल्यास तो लिंक ओपन करू नका.

सरकारी संकेतस्थळावर जाऊन अशा लिंक, वेबसाईटची माहिती घ्या. कमाई करणारी योजनेची माहिती लिंकद्वारे येणार असेल तर याविषयीची खातरजमा करून घ्या. त्यासाठी तुम्ही सरकारी वेबसाईटवर जाऊन पडताळा करू शकता. तुमच्या फोनमध्ये अँटीव्हायरस घ्या. कोणतेही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची माहिती करून घ्या. खासगी लिंक ऐवजी Google Play Store वा Apple App Store मधून ॲप डाऊनलोड करा. गडबड वाटल्यास सायबर गुन्हे शाखेकडे तात्काळ तक्रार करा. तुम्ही www.cybercrime.gov.in वर तक्रार करा अथवा 1930 वर कॉल करा.

आमिषाला बळी पडू नका

जगात विना कष्ट कोणालाही पैसे मिळत नाही, हे लक्षात ठेवा. कोणीही सहजा सहजी तुम्हाला पैसे देणार नाही. कोणताही योजना योग्य वाटत असली तरी सावधान राहा. गुंतवणुकीसाठी अभ्यासाची गरज आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. सजग राहा. दुसऱ्यांना पण याविषयीची माहिती द्या.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.