Gold smuggling | केसातून सोनं! सोने तस्करीसाठी तस्कराने कशी लढवली शक्कल?; व्हिडीओ व्हायरल

चोरी करायची म्हटली की चोर कोणत्याही पद्धतीने करु शकतो याची प्रचिती दिल्लीच्या (Delhi) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Airport) पाहायला मिळाली.

Gold smuggling | केसातून सोनं! सोने तस्करीसाठी तस्कराने कशी लढवली शक्कल?; व्हिडीओ व्हायरल
gold man
मृणाल पाटील

|

Apr 21, 2022 | 2:33 PM

मुंबई : चोरी करायची म्हटली की चोर कोणत्याही पद्धतीने करु शकतो याची प्रचिती दिल्लीच्या (Delhi) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Airport) पाहायला मिळाली. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका पठ्ठ्याच्या डोक्यातील केसाच्या विगमधून 30 लाखांचे सोने मिळाले. हा व्यक्ती अबूधाबी वरुन आला असून त्या प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सीमाशुल्क आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

तस्करी करणाऱ्या माणसाची पोलखाल

काय आहे व्हिडीओमध्ये

या माणसाने डोक्यातील केसाच्या विगमध्ये जवळपास 630 ग्रॅम वजनाचे सोने त्या प्रवाशाने लपवले होते. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करत डोक्यातील विगमधून सोनं काढतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशाने आपल्या खऱ्या केसांना काढून त्यावर 630 ग्रॅम वजनाचे सोने लपवले आणि त्यावर केसाचा विग लावला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न

डोक्यावर लावलेल्या खोट्या केसांच्या विगखाली ही पिशवी लपवण्यात आली होती ल. डोक्यावरून बनावट केसांचा विग काढला असता त्याखाली सोन्याचे पाऊच बाहेर आला. या सोन्याची किंमत 30 लाख आहे. सोने जप्त केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. तस्करांकडून नव्या मार्गाने सीमाशुल्क विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा कसा प्रयत्न केला जात आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.

नेहमीचंच रडगाणं

दिल्ली विमानतळावरून नेहमीच तस्करी करणारे प्रवाशी पकडले जातात. गेल्या वर्षी, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावर दोन प्रवासांना आंतरराष्ट्रीय हेरॉईन तस्करांना अटक केली होती. दोघांनी सुटकेस आणि पुस्तकांमध्ये अतिरिक्त थर टाकून हेरॉईन लपवले होते. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुस्तके आणि सुटकेसची झडती घेतली असता त्यात सुमारे 9.8 किलो हेरॉईन सापडला होता. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 68 कोटी रुपये आहे.

संबंधित बातम्या : 

‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

Video : कुत्रा आणि मांजराची लुटूपुटूची भांडणं, व्हीडिओ पाहून खऱ्या मित्राची व्याख्या कळेल…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें